नवी दिल्ली : भारत (Team India) आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तिसऱ्या टी-20 (T20) दरम्यान होळकर स्टेडियममध्ये डेकॉकचा खेळ अचूक थ्रोनं संपला तेव्हा सगळेच आश्चर्यचकित झाले. धुमधडाक्यात फलंदाजी करणारा क्विंटन डी कॉक चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत होता.
सलग दुसरे अर्धशतक ठोकल्यानंतर क्विंटन डी कॉक टीम इंडियाला अधिक धोकादायक दिसत होता. पण, जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक असलेल्या श्रेयसनं रॉकेट फेकत दक्षिण आफ्रिकेच्या दणका दिला.
How good was that throw by @ShreyasIyer15
????????#INDvsSA #INDvSA #Indiancricketteam #India #TeamIndia #shreyasiyer pic.twitter.com/zM4mQJMVCK— Vaishnavi Iyer (@Vaishnaviiyer14) October 4, 2022
दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 13व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हा धक्का बसला. 68 धावा खेळत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि सलामीवीर क्विंटन डी कॉकला दुसरी धाव घ्यायची होती. या प्रयत्नात तो बाहेर पडला. उमेश यादवचा वाईड यॉर्कर चेंडू बॅटच्या आतील काठावर आदळला.
पुढे फलंदाज दुसऱ्या धावांसाठी धावले. डिप मिडविकेटवर उभ्या असलेल्या श्रेयसनं चपळाईनं चेंडूकडे वळवला आणि नंतर एका शानदार थ्रोने चेंडू यष्टीरक्षक ऋषभ पंतकडे आणला. बाकीच्या कामात पंतने काहीही चूक केली नाही. डी कॉकने 43 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांसह 68 धावा केल्या.
नंतर, रिले रौसोने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावून दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या तीन विकेट्सवर 227 धावांवर नेली. रोसूने 48 चेंडूंत आठ षटकार आणि सात चौकारांसह नाबाद 100 धावांची खेळी केली.
ट्रिस्टन स्टब्स (23) आणि डेव्हिड मिलर यांनी अखेरच्या सामन्यात केवळ पाच चेंडूंत नाबाद 19 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी शेवटच्या आठ षटकात 108 धावा केल्या.