विशाखापट्टणम | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटी सामन्यात 106 धावांनी विजय मिळवत जोरदार पलटवार केला. टीम इंडियाने या विजयासह पहिल्या पराभवाचा हिशोबही बरोबर केला. इंग्लंडची 399 धावांचा पाठलाग करताना चांगलीच दमछाक झाली. टीम इंडियाने चौथ्या दिवशी इंग्लंडच्या 9 विकेट्स घेत 292 वर ऑलआऊट केलं. या विजयासह श्रेयस अय्यर याने इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याचाही हिशोब क्लिअर केला.
दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या पहिल्या डावात कॅप्टन बेन स्टोक्स याने उलट धावत श्रेयस अय्यर याचा कॅच पकडला होता. स्टोक्सने श्रेयसचा घेतलेला अफलातून कॅच पाहून खेळाडूंसह क्रिकेट चाहते थक्क राहिले. श्रेयस 29 धावांवर आऊट झाला. श्रेयसला आऊट केल्यानंतर स्टोक्सने बोट दाखवलं होतं. स्टोक्सचा बोट दाखवतानाचा फोटो व्हायरल झालेला.
वेळ प्रत्येकाची येते, त्यानुसार आता स्टोक्सची पाळी होती. इंग्लंडला टीम इंडियाने विजयासाठी 399 धावांचं आव्हान दिलं. इंग्लंडची या धावांचा पाठलाग करताना चांगलाच दम निघाला. इंग्लंड अडचणीत असताना बेन स्टोक्स ही एकमेव आशा होती. मात्र श्रेयसने स्टोक्सचा काटा काढत हिशोब क्लिअर केलाय.
अश्विनच्या बॉलिंगवर बेन फोक्स याने सिंगल काढण्याचा प्रयत्न केला. नॉन स्ट्राईक एंडवरुन स्टोक्स स्ट्राईक एंडच्या दिशेने धावला. मात्र चतुर श्रेयसने डायरेक्ट थ्रो करत स्टोक्सला रन आऊट केलं. स्टोक्सला रन आऊट केल्यांनतर श्रेयसनेही स्टोक्सला त्याच्याच पद्धतीने बोट दाखवून उत्तर दिलं. त्यानंतर आता स्टोक्स आणि श्रेयस या दोघांचा फोटो व्हायरल झालाय.
श्रेयस अय्यरचा कडक थ्रो आणि बेन स्टोक्स रन आऊट
Greatest Throw I have ever seen
Shreyas Iyer#ENGvsIND #INDvENGpic.twitter.com/MH4cjA8AqV
— ANGEL (@Aniiee234) February 5, 2024
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.