Cricket: श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, ईशान किशनचं कमबॅक, ‘टीम डी’ जाहीर

| Updated on: Aug 14, 2024 | 6:24 PM

Duleep Trophy 2024: बीसीसीआयने दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील डी टीमची कॅप्टन्सी मुंबईकर श्रेयस अय्यर याच्याकडे सोपवली आहे. तसेच ईशान किशन याचंही कमबॅक झालं आहे.

Cricket: श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, ईशान किशनचं कमबॅक, टीम डी जाहीर
Follow us on

बीसीसीआयच्या देशांतर्गंत 2024-2025 क्रिकेट हंगामाची सुरुवात ही या दुलीप ट्रॉफी स्पर्धेने होणार आहे. बीसीसीआयने आगामी दुलीप ट्रॉफी 2024 साठी 4 संघांची घोषणा केली आहे. बीसीसीआयने पहिल्या फेरीतील सामन्यांसाठी हा संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयने टीम ए, टीम बी, टीम सी आणि टीम डी अशा 4 संघांमधील खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने या दुलीप स्पर्धेतील डी टीमची धुरा ही मुंबईकर श्रेयस अय्यर याच्याकडे नेतृत्व सोपवलं आहे. तसेच ईशान किशन याचंही कमबॅक झालं आहे.

ईशान किशन गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. मात्र आता ईशानला देशांतर्गत स्पर्धेत संधी मिळाली आहे. त्यामुळे ईशानकडे टीम इंडियात कमबॅक करण्याची सुवर्णसंधी आहे. टीम डीमध्ये या दोघांव्यरिक्त अनेक कॅप्ड (आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले) खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, केएस भरत, तुषार देशपांडे आणि देवदत्त पडिक्कल या खेळाडूंचा समावेश आहे. तसेच अनेक अनुभवी युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. या स्पर्धेनिमित्ताने युवा खेळाडूंना अनुभवी क्रिकेटपटूंचं मार्गदर्शन मिळेल, जे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. दुलीप ट्रॉफी स्पर्धेला येत्या 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचं आयोजन हे अनंतपूर, आंधप्रदेश आणि बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियम येथे करण्यात आलं आहे.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक

5 सप्टेंबर, टीम ए विरुद्ध टीम बी, सकाळी 9 वाजता
5 सप्टेंबर, टीम सी विरुद्ध टीम डी, सकाळी 9 वाजता
12 सप्टेंबर, टीम ए विरुद्ध टीम डी, सकाळी 9 वाजता
12 सप्टेंबर, टीम बी विरुद्ध टीम सी, सकाळी 9 वाजता
19 सप्टेंबर, टीम बी विरुद्ध टीम डी, सकाळी 9 वाजता
19 सप्टेंबर, टीम ए विरुद्ध टीम सी, सकाळी 9 वाजता

दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी टीम डी : श्रेयस अय्यर (कॅप्टन), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन (विकेटकीपर), रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत (विकेटकीपर) आणि सौरभ कुमार.