मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघाचा प्रिन्स म्हणून ओळखला जाणारा शुबमन गिल इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. शुबमन गिल याने मागील सामन्यात अर्धशतक करत आपला फॉर्म सर्वांना दाखवून दिलं आहे. आज होणाऱ्या न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात शुबमन गिल याच्याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. कारण आज अवघ्या 14 धावा करून तो मोठा विक्रम रचण्याच्या तयारीमध्ये आहे. या फक्त 14 धावा नाहीतर तो वर्ल्ड रेकॉर्ड ठरणार आहे.
शुबमन गिल याने वन डे क्रिकेट फॉरमॅटमध्ये 38 डावात 1986 धावा केल्या असून 14 धावा पूर्ण केल्यावर तो 2000 धावा पूर्ण करणार आहे. सर्वात कमी डावांमध्ये अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. हा विक्रम आता दक्षिण आफ्रिका संघाचा माजी खेळाडू हाशिम आमला याच्या नावावर आहे. हाशिम आमलाने ४० डावांमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. 2011 मध्ये आमलाने हा विक्रम आपल्या नावावर केला होता. त्यावेळी आमला याने पाकिस्तानच्या झहीर अब्बासचा 28 वर्ष जुना विक्रम मोडला होता. अब्बासने 45 डावात सर्वात वेगवान 2000 धावा पूर्ण केल्या होत्या. अब्बासने 1983 मध्ये 45 व्या डावात दोन हजार धावा केल्या होत्या.
शुबमन गिल याने 2019 साली वर्ल्ड कपमध्ये पदार्पण केलं होतं. गिल 2023 मध्ये चांगलाच फॉर्ममध्ये दिसला, गेल्या 37 सामन्यांच्या 37 डावांमध्ये 64 च्या सरासरीने 1986 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 6 शतके आणि 10 अर्शतके केली असून एक डबल सेंच्युरीचाही यामध्ये समावेश आहे.
शुबमन गिल सलामीली खेळायला येतो, त्यामुळे न्यूझीलंड संघाच्या भेदक गोलंदाजीचं आव्हान त्याच्यासमोर असणार आहे. खतरनाक ट्रेंटब बोल्टसमोर गिल कशाप्रकारे फलंदाजी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आजचा सामना दुपारी दोन वाजता धर्मशाला स्टेडियममध्ये दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे.
रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, कुलदीप यादव