नवी दिल्ली : शुभमन गिल (Shubman Gill) सध्या चांगलाच चर्चेत आलाय. इंग्लंडमध्ये (England) तो दमदारपणे खेळत असल्यानं क्रिकेटविश्वाच्या नजरा देखील त्याच्याकडे लागल्या आहेत. फलंदाज शुभमन गिल सध्या इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट (County Cricket) खेळतोय. तो ग्लॅमर्गन काउंटीकडून खेळत असून आपल्या फलंदाजीची जादू दाखवतो आहे. या काऊंटीकडून खेळताना गिलनं शानदार फलंदाजी करत शतक झळकावलंय. या शुभमनच्या कामगिरीनंतर तो चांगलाच चर्चेत आलाय.
सध्या फक्त शुभमन आणि शुभमनच ऐकायला मिळतंय. ससेक्सविरुद्धच्या चार दिवसीय सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गिलनं शतक झळकावलं. गिलच्या शतकाच्या जोरावर ग्लॅमॉर्गननं आपली स्थिती मजबूत करत मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं पाऊल टाकलंय.
???????!!!
Shubman Gill makes a maiden Glamorgan century ???
123 balls, 12 fours, 2 sixes. Well batted, Shubman! ?
Glamorgan 245/4
????? ????: https://t.co/7M8MBwgNG2#SUSvGLAM | #GoGlam pic.twitter.com/D7fiC5jYmf
— Glamorgan Cricket ? (@GlamCricket) September 27, 2022
गिल पहिल्या दिवशी 91 धावा करून नाबाद परतला. दुसऱ्या दिवशी गिलने 50 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेत आपले शतक पूर्ण केले. या कौंटीसाठी त्याचे हे पहिले शतक आहे. ग्लॅमॉर्गनने दुसऱ्या दिवसाची सुरुवात तीन विकेट्सच्या मोबदल्यात 221 धावांवर केली.
भारतीय संघानं झिम्बाब्वेचा दौरा केला आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली. या मालिकेत गिलला संधी देण्यात आली होती. या मालिकेत गिलनं केएल राहुलसोबत डावाची सुरुवात केली आणि दोन उत्कृष्ट खेळी खेळल्या.
सामन्यात गिलशिवाय कर्णधार डेव्हिड लॉयड यानंह अर्धशतक झळकावलंय . यानं 56 धावांची खेळी खेळली. आपल्या खेळीत त्यानं 64 चेंडूंचा सामना केला आणि चार चौकारांव्यतिरिक्त दोन षटकार ठोकले. त्याचा साथीदार एडी बायरूमनं 21 धावांची खेळी खेळली. सॅम नॉर्थईस्टने 13 धावा केल्या.
दुसऱ्या दिवशी मात्र ग्लॅमॉर्गनला चौथा फटका बसण्यास वेळ लागला नाही. गिलसोबत पहिल्या दिवशी नाबाद असलेला बिली रूट 238 धावांच्या एकूण धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानं 64 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 21 धावा केल्या. तो सीन हंटने ठळकपणे मारला होता. त्यानं गिलसोबत चौथ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली.