अहमदाबाद | चेन्नई सुपर किंग्स टीमने गुजरात टायटन्स टीमवर शेवटच्या बॉलवर सनसनाटी विजय मिळवत पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन ठरली आहे. चेन्नईला विजयासाठी शेवटच्या 2 बॉलमध्ये 10 धावांची गरज होती. तेव्हा रविंद्र जडेजा याने सिक्स आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवर चौकार ठोकत चेन्नईला सनसनाटी विजय मिळवून दिला. चेन्नई यासह डकवर्थ लुईस नियमानुसार 5 विकेट्सने विजय झाली. चेन्नईने या विजयासह मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक 5 वेळा ट्रॉफी जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
गुजरातने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 214 धावा केल्या होत्या. त्यामुळे चेन्नईला विजयासाठी आधी 215 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात झाल्याच्या 3 बॉलनंतर पावसाची एन्ट्री झाली. पावसामुळे काही तास वाया गेले. त्यामुळे चेन्नईला डकवर्थ लुईस नियमानुसार 15 ओव्हर्समध्ये विजयासाठी 171 धावांच सुधारित आव्हान मिळालं. हे आव्हान चेन्नईने 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
चेन्नईकडून दुर्देवाने कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याचा अपवाद वगळता सर्वांनी विजयात योगदान दिलं. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनव्हे याने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. ऋतुराज गायकवाड 26 धावा करुन माघारी परतला. अंजिक्य रहाणेने 4 मोठ्या फटक्यांच्या मदतीने 27 धावा केल्या. आपली शेवटची मॅच खेळत असलेल्या अंबाती रायुडू याने निर्णायक क्षणी 8 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 1 चौकारच्या मदतीने 19 धावा ठोकल्या. त्यानंतर पुढच्याच बॉलवर धोनी आऊट झाला. धोनीला दुर्देवाने भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा या जोडीने चेन्नईला विजयी केलं. शिवम दुबे याने 21 बॉलमध्ये 32 धावांची नाबाद खेळी साकारली. तर रविंद्र जडेजा याने फक्त 6 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 1 फोर मारत चेन्नईला विजयी केलं.
त्याआधी चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकून गुजरात टायटन्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 214 धावा केल्या. गुजरातकडून साई सुदर्शन याने सर्वाधिक 96 धावांची खेळी केली. ऋद्धीमान साहा याने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. शुबमन गिल 39 रन्स करुन आऊट झाला. कॅप्टन हार्दिक पंड्या याने अखेरच्या काही षटकांमध्ये फटकेबाजी करत नॉट आऊट 21 रन्स केल्या. तर राशिद खान याला भोपळाही फोडता आला नाही. चेन्नईकडून मथिश पथिराना याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जडेजा आणि दीपक चाहर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
चेन्नईने पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली खरी,पण चेन्नईच्या खेळाडूंपैकी एकाही फलंदाजाला ऑरेन्ज कॅप जिंकण्यात यश आलं नाही. मात्र डेव्हॉन कॉनव्हे या कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर राहिला. कॉनव्हेने 47 धावांच्या खेळीसह पाचव्या क्रमांकावरुन तिसऱ्या स्थानी झेप घेतली. त्यामुळे विराट कोहली याची चौथ्या आणि यशस्वी जयस्वाल पाचव्या क्रमांकावर राहिला आहे. तर गुजरात टायटन्सचा युवा बॅट्समन शुबमन गिल हा या 16 व्या मोसमातील ऑरेन्ज कॅपचा विजेता ठरला आहे.
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
शुबमन गिल ऑरेन्ज कॅप विनर
Shubman Gill won hearts with the bat & scored 8️⃣9️⃣0️⃣ runs to bag the Orange Cap ?
He scored three centuries this season and played some pivotal knocks to guide his team to the Final ?#TATAIPL | #Final | #CSKvGT | @ShubmanGill pic.twitter.com/X9Qxktp6SS
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2023
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.