Shubman Gill याच्याबाबत मोठी अपडेट, पुढील 3-4 सामन्यांमधून बाहेर? Bcci ने म्हटलं….

| Updated on: Oct 09, 2023 | 4:33 PM

Shubman Gill Medical Update | टीम इंडियाचा पुढील सामना हा अफगाणनिस्तान विरुद्ध होणार आहे. त्याआधी टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे.

Shubman Gill याच्याबाबत मोठी अपडेट, पुढील 3-4 सामन्यांमधून बाहेर? Bcci ने म्हटलं....
Follow us on

मुंबई | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने पराभूत करत आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेची विजयी सुरुवात केली. टीम इंडियाने विजयासाठी मिळालेलं 200 धावांचं आव्हान हे 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाचे ईशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर हे तिघे झिरोवर आऊट झाले. मात्र विराट कोहली याने 85 आणि केएल राहुल याने नाबाद 97 धावा करुन टीम इंडियाला विजयी केलं. वर्ल्ड कपच्या सलामीच्या सामन्याला शुबमन गिल याला आजारामुळे खेळता आलं नाही. त्यामुळे गिलच्या जागी ईशान किशन याला संधी देण्यात आली. शुबमनला आजारपणामुळे मुकावं लागल्याने टीम इंडियाला मोठा झटका लागला. आता बीसीसीआयने शुबमन गिल याच्या आजाराबाबत माहिती दिली आहे.

शुबमन गिल याच्याबाबत मोठी माहिती

शुबमन गिल याला डेंग्यु झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला नाही. आता टीम इंडिया वर्ल्ड कपमधील आपला दुसरा सामना अफगाणिस्तान विरुद्ध बुधवारी 11 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळणार आहे. खेळणार आहे. शुबमन गिल या सामन्यातूनही जवळपास बाहेरच झाला आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार गिल अफगाणिस्तान विरुद्ध खेळणार नसल्याचंच एका अर्थाने म्हटलंय.

बीसीसीआयने ट्विटमध्ये काय म्हटलंय?

“टीम इंडियाचा फलंदाज शुभमन गिल 9 ऑक्टोबर भारतीय संघासोबत दिल्लीला रवाना होणार नाही. शुबमन गिल अफगाणिस्तान विरुद्धचा सामना खेळू शकणार नाही. शुबमन गिल चेन्नईतच थांबणार आहे. शुबमनवर मेडिकल टीम लक्ष ठेवून असणार आहे”, अशी माहिती बीसीसीआयने ट्विटद्वारे दिली आहे.

शुबमन गिलबाबत मोठी माहिती

दरम्यान टीम इंडियाचा वर्ल्ड कप मोहिमेतील तिसरा सामना हा शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा हायव्होल्टेज सामना असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी या सामन्यात भिडणार आहेत. आता शुबमन पाकिस्तान विरुद्धचा सामना खेळणार की नाही, याबाबत बीसीसीआयने काहीच माहिती दिलेली नाही. मात्र शुबमन पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता फारच कमी आहे.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.