WTC Final 2023 : आयपीएल फायनल जिंकल्यावर मिशन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी सीएसकेचे हुकमी एक्के दाखल

| Updated on: Jun 02, 2023 | 12:55 AM

आयपीएल 2023 च्या फायनलमुळे या खेळाडूंना लंडनला पोहोचण्यास उशीर झाला. 29 मे रोजी, IPL 2023 चा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होता त्यामुळे  हे खेळाडू उशिरा पोहोचले.

WTC Final 2023 : आयपीएल फायनल जिंकल्यावर मिशन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी सीएसकेचे हुकमी एक्के दाखल
Follow us on

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2023 साठी भारतीय टीमची शेवटची बॅच देखील लंडनला पोहोचली आहे. यामध्ये शुबमन गिल, रवींद्र जडेजा, अजिक्य रहाणे, केएस भरत आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. आयपीएल 2023 च्या फायनलमुळे या खेळाडूंना लंडनला पोहोचण्यास उशीर झाला. 29 मे रोजी, IPL 2023 चा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होता त्यामुळे  हे खेळाडू उशिरा पोहोचले.

शुबमन गिल, केएस भरत आणि मोहम्मद शमी हे आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा भाग होते, तर चेन्नई सुपर किंग्जमध्ये रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे होते. यातील काही खेळाडूंनी इंग्लंडला पोहोचल्याची माहिती दिली आहे. गुरुवारपासून हे खेळाडू सरावाला सुरुवात करतील.

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड संपूर्ण भारतीय संघासोबत सराव सत्र घेणार आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, सिराज, शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांनी सराव सत्रात भाग घेतला. 7 जूनपासून सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघ कोणताही सराव सामना खेळणार नाही.

 

टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. याआधी 2021 ला टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली फायनलमध्ये गेली होती. फायनल सामना न्यूझीलंडशी झाला होता. त्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी टीम इंडियाचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, केएस भरत, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, विराट कोहली, इशान किशन, चेतेश्वर पुजारा, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट आणि उमेश यादव.

स्टँडबाय खेळाडू – सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि मुकेश कुमार.