मुंबई : टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा हिटमॅन रोहित शर्मा सांभाळत आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संघ चांगली कामगिरी करतच आहे, मात्र मोठ्या स्पर्धांमध्ये संघाला अपयश येताना दिसत आहे. आशिया कप 2022, वर्ल्डकप 2022 या मोठ्या स्पर्धांमध्ये दिसून आलं. आता WTC 2023 फायनल, एकदवसीय वर्ल्ड कप 2023 आणि आशिया कप या स्पर्धा यंदाच्या वर्षी होणार आहेत. आयसीसीच्या टुर्नामेंट झाल्या की रोहित शर्मानंतर हार्दिक पंड्याकडे कर्णाधारपद जाणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र पंड्याऐवजी दुसऱ्याच एका युवा खेळाडूकडे जाण्याची शक्यता आहे.
बीसीसीयआयचाही तसाच काहीसा प्लॅन असू शकतो. हार्दिक पंड्या नाहीतर मग असा कोणता खेळाडू आहे, ज्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून शुबमन गिल आहे. 23 वर्षीय गिलला तसा कमीच अनुभव असणार मात्र बीसीसीआय एक प्रयोग म्हणून त्याच्यावर जबाबदारी देऊ शकत.
शुबमन गिलने यंदाच्या आयपीएलमध्ये तीन शतके मारत त्याची ताकद दाखवून दिली आहे. इतकंच नाहीतर क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटध्ये शतक झळकवणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक केलं आहे.
शुबमन गिलचा 2018 अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या अंडर-19 संघात त्याचा प्रथम उपकर्णधार म्हणून समावेश करण्यात आला होता. शुभमनने या स्पर्धेत 124.00 च्या सरासरीने 372 धावा केल्या आणि भारताच्या विक्रमी चौथ्या विश्वविजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी येणाऱ्या गिलला स्पर्धेतील म्रॅन ऑफ द ट टूर्नामेंट म्हणून गौरवण्यात आलं होतं. यामधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्याने नाबाद 102 धावांची खेळी केली होती.
दरम्यान, 7 जूनला सुरू होणाऱ्या WTC 2023 च्या फायनल सामन्यात गिलच्या कामिगरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. भारतात शेर ठरलेला गिल परदेशातही आपला फॉर्म कायम ठेवतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे .