टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर तिसरी एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध टी 20I मालिकेनंतर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा या मालिकेत भारताचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा आहे. शुबमन गिल याने सामन्याच्या काही तासांआधी उपकर्णधारपदाची जबबादारी मिळाल्यानंतर कसं वाटतयं? याबाबत प्रतिक्रिया दिली. तसेच शुबमनने कर्णधार रोहितच्या कामगिरीबाबतही मत मांडलं.
“मी उपकर्णधारपदाकडे एक आव्हान म्हणून पाहतो. मी आधी वैयक्तिक कामगिरी आणि त्यानंतर जर रोहित भाईला गरज पडली तर मला काय वाटतं हे सांगून नेतृत्व करेन. मी काय विचार करतो हे रोहितला सांगणं माझी जबाबदारी आहे. एका मालिकेतील कामगिरीवरुन संपूर्ण संघाच्या कामगिरीबाबत आकलन करु शकत नाही. अनेक असे खेळाडू आहेत ज्यांनी गेल्या काही मालिकेत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे”, असं शुबमनने म्हटलं.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरला. तसेच रोहितला रणजी ट्रॉफीतही काही करता आलं नाही. “रोहित गेल्या दीड वर्षांपासून जशी बॅटिंग करतोय त्यामुळे साऱ्या सामन्याचा चेहरामोहरा बदलतो. रोहित सामन्याच्या सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी संघावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे रोहितसोबत बॅटिंग करणाऱ्या आणि बॅटिंगसाठी येणारा पुढील फलंदाजांवरील दबाव कमी होतो. त्यामुळे टीमला खूप मदत मिळते”, असंही शुबमनने म्हटलं.
उपकर्णधार शुबमन गिल
Responsibility of being a vice-captain 👍
Learning from Captain Rohit Sharma and Head Coach Gautam Gambhir 👌
Shubman Gill shares his thoughts 💬 💬#TeamIndia | #INDvENG | @IDFCFirstBank | @ShubmanGill pic.twitter.com/L7LWgPY9nq
— BCCI (@BCCI) February 4, 2025
वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा.