IND vs PAK | पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी आयसीसीचा शुबमन गिल याच्याबाबत मोठा निर्णय

| Updated on: Oct 13, 2023 | 3:34 PM

Shubman Gill Icc World Cup 2023 | शुबमनला डेंग्युची लागण झाल्याने त्याला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळता आलं नाही. मात्र पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी आयसीसीने शुबमनबाबत मोठी घोषणा केली आहे.

IND vs PAK | पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी आयसीसीचा शुबमन गिल याच्याबाबत मोठा निर्णय
Follow us on

मुंबई | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून जोरदार सुरुवात केली आहे. मात्र डेंग्युमुळे टीम इंडियाचा स्टार ओपनर शुबमन गिल याला या दोन्ही सामन्यांना मुकावं लागलं. टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील तिसरा सामना हा पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. आयसीसीने या सामन्याआधी शुबमन गिल याच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने घेतलेला निर्णय शुबमन गिल कधीच विसरु शकणार नाही. आयसीसीने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

शुबमनने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी नेट्समध्ये जोरदार सराव केला. शुबमनच्या या सरावामुळे तो पाकिस्तान विरुद्ध खेळणार असल्याच म्हटलं जात आहे. त्याआधीच आयसीसी मोठी घोषणा केलीय. आयसीसीने शुबमनची सप्टेंबर महिन्यासाठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ या पुरस्कारासाठी निवड केली आहे. शुबमन यासह आयसीसीचा हा पुरस्कार जिंकणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. शुबमन गिल याच्याआधी टीम इंडियाकडून प्रत्येकी 1 वेळा ऋषभ पंत, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

आयसीसीकडून प्रत्येक महिन्यात शानदार कामगिरी करणाऱ्या 3 खेळाडूंना या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात येतं. त्यानुसार आयसीसीने मोहम्मद सिराज, डेव्हिड मलान आणि शुबमन गिल या तिघांची निवड केली होती. मात्र शुबमन गिल याने या दोघांना पछाडत हा पुरस्कार पटकावला. शुबमनने सप्टेंबर महिन्यात आशिया कपमध्ये दमदार कामगिरी केली. शुबमनने सप्टेंबर महिन्यात 480 धावा केल्या. त्यापैकी 302 धावा या आशिया कप 2023 स्पर्धेत केल्या.

शुबमनचा आयसीसीकडून दुसऱ्यांदा सन्मान

दरम्यान टीम इंडिया ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांना पराभूत केल्यानंतर पाकिस्तान विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे. पाकिस्तान विरुद्धचा सामना हा दुपारी 2 वाजता सुरु होईल. आता या सामन्यात शुबमन गिल याची एन्ट्री झाली तर ईशान किशन याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल. त्यामुळे आता शुबमनची एन्ट्री होते की नाही, हे काही तासांमध्येच स्पष्ट होईल.