विशाखापट्टणम | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसऱ्या कसोटी सामना सुरु आहे. सामना रंगतदार स्थितीत आहे. टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीवर घट्ट पकड मिळवली आहे. टीम इंडियाला या 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला विजय दृष्टीक्षेपात असताना एक वाईट बातमी समोर आली आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिल याला दुखापत झाली आहे.
शुबमन गिलने दुसऱ्या डावात टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक शतक ठोकलं. त्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडसमोर 399 धावांचं आव्हान ठेवलं. इंग्लंडने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 विकेट गमावून 67 धावा केल्या. त्यामुळे चौथ्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी आणखी 332 धावा हव्या आहेत.
चौथ्या दिवसासाठी टीम इंडियाचे खेळाडू आणि इंग्लंडचे फलंदाज मैदानात आले. तेव्हा टीम इंडियासोबत शुबमन गिल दिसला नाही. शुबमन गिलला दुखापत झाल्याचं समजलं. गिलच्या उजव्या हाताच्या बोटाला रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुखापत झाली. त्यामुळे गिल फिल्डिंगसाठी मैदानात येणार नसल्याचं सांगण्यात आलं. शुबमनच्या अनुपस्थितीत सरफराज खान बदली खेळाडू म्हणून आता मैदानात आहे.
टीम इंडियाची दुसऱ्या डावात घसरगुंडी झाली. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल सलामी जोडी झटपट आऊट झाल्यानंतर शुबमनने श्रेयस अय्यर याच्यासह डाव सावरला. त्यानंतर दुसऱ्या बाजूने विकेट्स जाणं सुरुच होतं. मात्र शुबमनने एक बाजू लावून धरलेली. शुबमनने सिंगल-डबल करत एक एक धाव जोडली. तसेच संधी मिळेल तेव्हा फटकेही मारले. शुबमनने अशा प्रकारे कसोटीतील तिसरं आणि एकूण 10 वं शतक पूर्ण केलं.
शुबमन गिलला दुखापत
Shubman Gill won’t be fielding today.
– Gill has hurt his right index finger yesterday. pic.twitter.com/Dvl8sl6oKQ
— Johns. (@CricCrazyJohns) February 5, 2024
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.