कोलंबो | श्रीलंका क्रिकेट टीमने बांगलादेशला आशिया कप 2023 सुपर 4 मधील ‘करो या मरो’ सामन्यात विजयासाठी 258 धावांचं आव्हान दिलंय. श्रीलंकेने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 277 धावा केल्या. श्रीलंकेकडून सदीरा समरविक्रमा याने सर्वाधिक धावा केल्या. सदीराने केलेल्या या वादळी खेळीमुळे श्रीलंकेला 250 पार मजल मारता आली. सदीरा याला शतक करण्याची संधी होती. मात्र सदीरा श्रीलंकेच्या डावातील शेवटच्या बॉलवर 93 धावांवर आऊट झाला. तर कुसल मेंडील याने 50 धावांची खेळी केली. तसेच ओपनर पाथुम निशांका याने 40 रन्सचं योगदान दिलं. अखेरच्या क्षणी कॅप्टन दासून शनाका याने 24 धावांची उपयोगी खेळी केली.
सदीरा समरविक्रमा याची विक्रमी खेळी
Sri Lanka sets a target of 258! Sadeera’s brilliant 93 and Kusal’s 50 have set the stage. Now, it’s over to our bowlers to shine!#AsiaCup2023 #SLvBAN #LankanLions pic.twitter.com/mYFm3GqsBE
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 9, 2023
बांगलादेशने टॉस जिंकून श्रीलंकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. श्रीलंकेने संयमी सुरुवातीनंतर 34 धावांवर पहिली विकेट गमावली. दिमुथ 18 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर कुसम मेंडीस आणि पाथुम निसांका या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 72 रन्सची पार्टनरशीप केली. पाथुम निसांका 40 धावांवर आऊट झाला. कुसल मेंडीस याने बांगलादेश विरुद्ध सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. कुसल 73 बॉलमध्ये 50 धावा करुन आऊट झाला.
त्यानंतर बांगलादेशने श्रीलंकेला ठराविक अंतराने झटके दिले. मात्र यातही सदीराने एक बाजी लावून धरत श्रीलंकेचा डाव सावरला. सदीराने शेवटच्या बॉलवर आऊट झाला. मात्र तोवर त्याने आपली भूमिका पार पाडली. सदीराने 72 बॉलमध्ये 8 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 93 धावांची खेळी केली. सदीराचं पहिलंवहिलं शतक होता होता राहिलं. मात्र सदीराची ही वनडे करियरमध्ये सर्वोच्च धावसंख्या ठरली.
तर कॅप्टन दासून शनाका याने 32 बॉलमध्ये 24 रन्सचं योगदान दिलं. याशिवाय इतरांना विशेष काही करता आलं नाही. बांगलादेशकडून तास्किन अहमद आणि हसन महमूद या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर शोरिफूल इस्लाम याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.
बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन), मोहम्मद नईम, लिटॉन दास, तोहिद हृदाय, शमिम होसेन, मुशफिकर रहिम (विकेटीपर), अफीफ होसेन, मेहदी हसन मिराज, तास्किन अहमद, शोरिफूल इस्लाम आणि हसन महमुद.