SL vs IND 1st Odi: टीम इंडिया रोहित शर्मा कॅप्टन सलामीच्या सामन्यात ‘या’ दोघांना पदार्पणाची संधी देणार?

| Updated on: Aug 01, 2024 | 10:54 PM

Sri Lanka vs India 1st Odi: टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यातील अखेरच्या टी 20i मालिकेला 2 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या सलामीच्या सामन्यातून टीम इंडियाच्या दोघांना पदार्पणाची संधी मिळणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.

SL vs IND 1st Odi: टीम इंडिया रोहित शर्मा कॅप्टन सलामीच्या सामन्यात या दोघांना पदार्पणाची संधी देणार?
rohit gambhir and agarkar
Image Credit source: Bcci x Account
Follow us on

सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात श्रीलंकेचा टी20i मालिकेत धुव्वा उडवल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघांच एकदिवसीय मालिकेकडे लक्ष आहे. तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहली टी20i निवृत्तीनंतर कमबॅक करण्यासाठी सज्ज आहेत. टीम इंडिया या मालिकेतून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सरावाच श्रीगणेशा करणार आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघ श्रीलंकेचं करणार आहे. तर चरिथ असालंकाकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची धुरा आहे. टीम इंडियाकडून सलामीच्या सामन्यात 2 युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

श्रीलंके विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी हर्षित राणा आणि रियान पराग या 2 युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रियान परागचा श्रीलंका आणि झिंबाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेतही समावेश होता. रियानला श्रीलंकेविरुद्ध बॉलिंग आणि बॅटिंगने उल्लेखनीय कामगिरी केली. तर हर्षितची टीम इंडियात निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित, विराटसह ऑलराउंडर रवींद्र जडेजा यानेही निवृत्ती घेतली. तर रियान पराग बॅटिंगसह बॉलिंगही करतो. तसेच आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हिशोबाने रियान हा जडेजाचा वारसदार ठरु शकतो. त्यामुळे टीम मॅनेजमेंट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हिशोबाने रियान परागला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची संधी द्यायला हवी, अशी मागणी क्रिकेट चाहत्यांची आहे.

टीम इंडियाचा वनडे सीरिजसाठी जोरदार सराव


वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, खलील अहमद, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग आणि हर्षित राणा.

श्रीलंका टीम : चरिथ असालंका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराझ, चमिका करुणा, चमिका करुणा, मोहम्मद शिराज मेंडिस, निशान मधुष्का आणि एशान मलिंगा.