श्रीलंकेने टीम इंडियाला कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमध्ये सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजयासाठी 231 धावांचं आव्हान दिलं आहे. श्रीलंकने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 230 धावा केल्या. श्रीलंकेसाठी दुनिथ वेल्लालागे याने सर्वाधिक धावा केल्या. तर त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी झटपट धक्के दिल्याने श्रीलंकेची नाजूक स्थिती झाली होती. मात्र युवा दुनिथ वेल्लालगे याने चिवट अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेला भारतासमोर सन्मानजनक आव्हान देता आलं. श्रीलंकेसाठी पाथुम निसांकाने 56 धावा केल्या. तर दुनिथ वेल्लालगे याने नाबाद 66 धावांची निर्णायक खेळी केली.
भारतीय गोलंदाजांनी टॉस जिंकून बॅटिंगसाठी आलेल्या श्रीलंकेला ठराविक अंतराने धक्के दिले. त्यामुळे श्रीलंकेची नाजूक स्थिती झाली होती. मात्र ओपनर पाथुम निसांका आणि त्यानंतर दुनिथ वेल्लागाले या दोघांनी केलेल्या अर्धशतकामुळे श्रीलंकेला 200 पार पोहचता आलं. पाथुमने 75 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. तर दुनिथ वेल्लालागे याने 65 बॉलमध्ये 7 फोर आणि 2 सिक्ससह नॉट आऊट 67 रन्स केल्या. वानिंदु हसरंगाने 35 बॉलमध्ये 24 धावांचं योगदान दिलं. धनंजयाने 17 आणि कुसल मेंडीसने 14 धावा जोडल्या. समिरविक्रमाने 8 तर मोहम्मद शिराज आणि अविष्का फर्नांडो या दोघांनी 1-1 धाव केली.
टीम इंडियाकडून एकूण 7 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी 6 जणांनी विकेट घेण्यात यश आलं. तर शुबमन गिल अपयशी ठरला. शुबमन गिल याने 1 ओव्हरमध्ये 14 धावा लुटवल्या. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, शिवम दुबे, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर या चौकडीने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियासमोर 231 धावांचं आव्हान
Innings Break!
A fine bowling effort from #TeamIndia restricts Sri Lanka to 230/8.
Stay tuned for the chase! ⏳
Scorecard ▶️ https://t.co/4fYsNEzO5N#SLvIND pic.twitter.com/gpbB53j2NE
— BCCI (@BCCI) August 2, 2024
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन: चारिथ असालंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटीकपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालगे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो आणि मोहम्मद शिराज.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.