श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी20i मालिकेनंतर उभयसंघांमध्ये आज 2 ऑगस्टपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. उभयसंघातील पहिल्या एकदिवसीय सामन्याचं आयोजन हे आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे करण्यात आलं आहे. रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाचं नेतृत्व आहे. तर चरिथ असलांकाच्या खांद्यावर श्रीलंकेचं नेतृत्व आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 2 वाजता टॉस पार पडला. श्रीलंकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कॅप्टन चरिथने बॅटिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला फिल्डिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज यजमानांना किती धावांपर्यंत रोखण्यात यश मिळवणार? याकडे लक्ष असणार आहे.
टीम इंडियात टी 20 वर्ल्ड कपनंतर संघात कॅप्टन रोहित शर्मासह, विराट कोहली, कुलदीप यादव या तिघांचं कमबॅक झालं आहे. तर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या जोडीचं अनेक महिन्यांनी संघात पुनरागमन झालं आहे. तसेच केएल राहुल याचा विकेटकीपर म्हणून समावेश करण्यात आल्याने ऋषभ पंत याला डच्चू मिळाला आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेकडून मोहम्मद शिराज याचं पदार्पण झालं आहे. याची माहिती टॉस दरम्यान कॅप्टन चरिथ असालांका याने दिली.
दरम्यान एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडिया श्रीलंकेवर वरचढ राहिली आहे. उभयसंघात 168 एकदिवसीय सामने झाले आहेत. टीम इंडिया 99 सामन्यांमध्ये विजयी झाली आहे. तर श्रीलंकेने 57 सामने जिंकले आहेत. 1 सामना हा टाय तर 11 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.उभयसंघात एकूण 18 मालिका झाल्या आहेत. त्यापैकी भारताने 15 एकदिवसीय मालिकांमध्ये विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेने 2 मालिकेत टीम इंडियावर मात केली आहे. श्रीलंकेने या दोन्ही मालिका आपल्या देशात जिंकल्या आहेत. तर 3 मालिका बरोबरीत राहिल्या आहेत.
श्रीलंकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल
🚨 Toss and Team Update 🚨
Sri Lanka win the toss and elect to bat in the 1st ODI.
A look at #TeamIndia‘s Playing XI 👌👌
Follow the Match ▶️ https://t.co/4fYsNEzO5N#SLvIND pic.twitter.com/NVJ4spwt0K
— BCCI (@BCCI) August 2, 2024
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन: चारिथ असालंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटीकपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो आणि मोहम्मद शिराज.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.