टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यात टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. टीम इंडिया या दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येकी 3-3 सामने खेळणार आहे. टीम इंडिया टी 20 मालिकेने दौऱ्याची सुरुवात करणार आहे. तसेच सूर्यकुमार यादव याच्यासाठी कर्णधार म्हणून तर गौतम गंभीर याच्यासाठी हेड को म्हणून ही पहिलीच सीरिज आहे. तर यजमान श्रीलंकाही पहिल्या सामन्यासाठी सज्ज आहे.चरिथ असलांका हा टीम इंडिया विरुद्ध श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. टी 20i मालिकेतील पहिला सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार? कोणत्या चॅनेलवर दिसणार? हे आपण जाणून घेऊयात.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना शनिवारी 27 जुलैला होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया पहिला सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.
नवे भिडू नवे राज्य
Two new captains will clash in the #SLvIND T20I series beginning tomorrow 🏆 pic.twitter.com/Njus7E9eFt
— ICC (@ICC) July 26, 2024
टी 20 सीरिजसाठी श्रीलंका टीम: चरिथ असलांका (कॅप्टन), पथुम निसांका, कुसल परेरा ,अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लालागे ,महेश तीक्षाना,चामिंडु विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, बिनुरा फर्नांडो, दिलशान मधुशंका आणि असिथा फर्नांडो
टी20i मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.