SL vs IND 2nd T20I: पावसामुळे टीम इंडियाला सुधारित आव्हान, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

| Updated on: Jul 28, 2024 | 10:55 PM

Sri Lanka vs India 2nd T20i: टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी 20I सामन्यात पावसाने खोडा घातला. त्यामुळे टीम इंडियाला सुधारित धावांचं आव्हान मिळालं आहे.

SL vs IND 2nd T20I: पावसामुळे टीम इंडियाला सुधारित आव्हान, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
Rain
Follow us on

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात पावसाने खोडा घातला. सामन्यातील दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या बॅटिंगदरम्यान पावसाने भारतीय वेळेनुसार 9 वाजून 35 मिनिटांनी एन्ट्री घेतली. तोवर टीम इंडियाने श्रीलंकेने दिलेल्या 162 धावांचा पाठलाग करताना 0.3 ओव्हरमध्ये बिनबाद 6 धावा केल्या. त्यानंतर पावसामुळे आणि मग ओल्या खेळपट्टीमुळे एक तासाचा वेळ वाया गेला. अथक प्रयत्नानंतर अखेर ग्राउंड्स स्टाफला खेळपट्टी कोरडी करण्यात यश आलंय. मात्र बराच वेळ वाया गेला. त्यामुळे टीम इंडियाला डीएलएसनुसार सुधारित आव्हान मिळालं आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

पावसामुळे ओव्हर कट, टार्गेट किती?

पावसामुळे तब्बल 12 ओव्हरचा खेळ वाया गेला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाला डीएलएसनुसार, आता 8 ओव्हरमध्ये 78 धावांचं आव्हान मिळालं आहे. श्रीलंकेकडून एकूण 4 गोलंदाजांना प्रत्येकी 2 ओव्हर टाकता येतील. तसेच पहिले 2 ओव्हर पावरप्ले असणार आहे. टीम इंडियाने पहिल्या 3 ओव्हरमध्ये 6 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता भारताला सुधारित आव्हानानुसार 45 बॉलमध्ये आणखी 72 धावा कराव्या लागणार आहेत. सामन्याला रात्री 10 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

टीम इंडियाला 8 ओव्हरमध्ये 78 धावांचं आव्हान

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरित असलंका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस(विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश तीक्षना, मथीशा पाथिराना आणि असिथा फर्नांडो.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि मोहम्मद सिराज.