SL vs IND 3rd T20: श्रीलंकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, टीम इंडियाची बॅटिंग

| Updated on: Jul 30, 2024 | 8:12 PM

Sri Lanka vs India 3rd T20i Toss: टीम इंडिया विरुद्धच्या टी 20i मालिकेत 2-0 ने पिछाडीवर असलेल्या श्रीलंकेने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टॉस जिंकला आहे.

SL vs IND 3rd T20: श्रीलंकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, टीम इंडियाची बॅटिंग
sl vs ind toss
Follow us on

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी20i मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्याचं आयोजन हे पल्ल्केले आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे करण्यात आलं आहे. या सामन्याला पावसामुळे तब्बल 1 तास विलंबाने रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी टॉस झाला. श्रीलंकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन चरिथ असलंका याने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडंल आहे. टीम इंडिया श्रीलंके विरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे.

श्रीलंकेककडून चामिंडु विक्रमासिंघे याचं पदार्पण

टीम इंडियाने ही मालिका जिंकलेली आहे. त्यामुळे भारताने शेवटच्या सामन्यासाठी 4 बदल केले आहेत. तर श्रीलंकेकडून एकमेव बदल करण्यात आला आहे. श्रीलंकेसाठी चामिंडु विक्रमासिंघे याने पदार्पण केलं आहे. चामिंडु श्रीलंकेसाठी टी20i पदार्पण करणारा 108 वा खेळाडू ठरला आहे. चामिंडुला अंतिरिम प्रशिक्षक सनथ जयसूर्याने यांनी कॅप दिली आणि त्याचं अभिनंदन केलं. चामिंडुला दासून शनाका याच्या जागी संधी देण्यात आली आहे.

टीम इंडियात 4 बदल

तर टीम इंडियात उपकर्णधार शुबमन गिल याचं कमबॅक झालंय. शुबमनला दुसऱ्या सामन्यात मानेच्या त्रासामुळे खेळता आलं नव्हतं. तसेच शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर आणि खलील अहमद या तिघांना संधी देण्यात आली आहे. तर हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंह, अक्षर पटेल आणि ऋषभ पंत या चौघांना विश्रांती देण्यात आली आहे.

संधीच्या प्रतिक्षेत असलेल्या खेळाडूंचा समावेश

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरित असलंका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश तीक्षाना, मथीशा पाथिराना आणि असिथा फर्नांडो.