टीम इंडिया सलग 2 सामने जिंकल्यानंतर श्रीलंके विरुद्धच्या तिसऱ्या टी20I सामन्यात विजय मिळवून हॅटट्रिक करण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात दोन्ही सामन्यात श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. भारताने पहिला सामना हा 43 धावांनी जिंकला. तर दुसरा सामना हा डीएसनुसार 7 विकेट्सने जिंकला. टीम इंडियाने या विजयासह मालिकाही जिंकली. टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तर सीरिजमधील तिसरा आणि शेवटचा सामना हा मंगळवारी 30 जुलैला होणार आहे. टीम इंडियाकडे तिसऱ्या सामन्यासह विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे.
रोहित शर्मा याने टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर या छोट्या फॉर्मटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर सूर्यकुमार यादवला कर्णधार करण्यात आलं. सूर्याने आपल्या कॅप्टन्सीच्या नव्या इनिगंची सुरुवात दणक्यात करत दोन्ही सामने जिंकून देण्यात यश मिळवलं. आता सूर्याचा तिसरा सामनाही जिंकून देत कर्णधार म्हणून आपली पहिलीच मालिका अविस्मरणीय अशी करण्याचा प्रयत्न असणार आहे.
दरम्यान टीम इंडियाने दुसऱ्या टी 20I सामन्यातील विजयासह मोठा विक्रम केला आहे. टीम इंडियाने टी20I क्रिकेट इतिहासात आतापर्यंत श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने श्रीलंकेला 21 सामन्यात पराभूत केलं आहे. त्यामुळे आता भारताचा सोमवारी 22 वा विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे.
टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
India ensure series victory with second win in a row 👊#SLvIND: https://t.co/ruw5VGncoa pic.twitter.com/YNmzxFIhI8
— ICC (@ICC) July 28, 2024
टी 20 सीरिजसाठी श्रीलंका टीम: चरिथ असलांका (कॅप्टन), पथुम निसांका, कुसल परेरा ,अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लालागे ,महेश तीक्षाना,चामिंडु विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, बिनुरा फर्नांडो, दिलशान मधुशंका आणि असिथा फर्नांडो
टी20i मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.