श्रीलंके विरूद्धच्या 3 वनडे आणि तितक्याच टी 20i सामन्यांसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवला टी 20 फॉर्मेटसाठी कर्णधारपद देण्यात आलं आहे. तर वनडे सीरिजसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं कमबॅक झालं आहे. तर जसप्रीत बुमराह याला दोन्ही मालिकांमधून विश्रांती देण्यात आली आहे. तसेच ऋतुराज गायकवाड याला वगळल्याने बीसीसीआय निवड समितीवर टीका करण्यात येत आहे.
गौतम गंभीर या दौऱ्यापासून टीम इंडियाचा हेड कोच म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहे. गंभीरची हेड कोच म्हणून नियुक्ती होताच श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियात केकेआर टीममधील 3 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. हर्षित राणा याची पहिल्यांदाच वनडे टीममध्ये संधी देण्यात आली आहे. रिंकु सिंहला टी 20 संघात स्थान देण्यात आलंय. तर श्रेयस अय्यर याची आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर तब्बल 8 महिन्यांनी एन्ट्री झाली आहे.
फिनिशर रिंकू सिंह याचा टी 20 वर्ल्ड कपसाठी राखीव म्हणून समावेश करण्यात आला होात. त्यानंतर झिंबाब्वे विरूद्धच्या मालिकेत रिंकूने स्वत:ला सिद्ध केलं. रिंकूने त्याआधी आयपीएलमध्ये फारशी खास कामगिरी केली नाही. मात्र त्यानंतरही आता निवड समितीने रिंकूवर विश्वास दाखवला आहे.
हर्षित राणा याची झिंबाब्वे विरूद्धच्या टी 20 सीरिजसाठी निवड करण्यात आली होती. मात्र त्याचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नव्हता. हर्षितने आयपीएलच्या 17 व्या मोसमात (2024) उल्लेखनीय कामगिरी केली होती. हर्षितने 13 सामन्यांमध्ये 383 धावांच्या मोबदल्यात 19 विकेट्स घेतल्या होत्या.
श्रेयस अय्यर याचं वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर टीम इंडियात कमबॅक झालं आहे. श्रेयस गेल्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. श्रेयसला मध्यंतरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळल्याने बीसीसीआयने त्याला वार्षिक करारातून वगळण्यात आलं होतं. श्रेयसने आयपीएलच्या 17 व्या मोसमात केकेआरला चॅम्पियन केलं होतं.
Your #TeamIndia squads that will take on the Lankan Lions! 🇮🇳 pic.twitter.com/LWp9YaXM1N
— KolkataKnightRiders (@KKRiders) July 18, 2024
टी20i मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकप्तान), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.