टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या श्रीलंका दौऱ्यातील टी 20 मालिकेत कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळण्यासाठी सज्ज आहे. हार्दिक पूर्णपणे फिट असून तो खेळण्यासाठी तयार असल्याची माहिती बीसीसीआयला देण्यात आली आहे. तसेच हार्दिकने तो टी 20 मालिकेत नेतृत्व करण्यासाठी तयार असल्याचंही म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पंड्याने श्रीलंका दौऱ्यासाठी निवडीसाठी उपलब्ध असल्याची माहिती बीसीसीआयला दिली आहे. टीम इंडियाची श्रीलंका दौऱ्यासाठी केव्हाही घोषणा होऊ शकते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक श्रीलंका विरूद्धच्या 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेत कॅप्टन्सी करणार आहे. तर त्यानंतर होणार्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी हार्दिक उपलब्ध नसल्याचं म्हटलं जात आहे. हार्दिक उपलब्ध नसण्यामागे वैयक्तिक कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. हार्दिक पंड्याने नुकत्याच झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली होती. हार्दिकने टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली.
हार्दिक आयपीएल 2024 पासून सातत्याने क्रिकेट खेळतोय. तसेच हार्दिकने अनेकदा रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची टी 20 मालिकेत धुरा सांभाळली आहे. आता रोहित आणि विराट कोहली हे दोघे टी 20 क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. तसेच हार्दिककडे कॅप्टन्सीचा पर्याप्त अनुभवही आहे. त्यामुळे हार्दिक पंड्या तगडा दावेदार आहे. निवड समितीनेही हार्दिक व्यतिरिक्त इतर कुणाचाही विचार केला नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता सर्व चित्र स्पष्ट आहे.
INDIAN CRICKET UPDATES. [Kushan Sarkar from PTI]
– Hardik Pandya to lead in T20I vs SL
– Hardik Pandya might take rest in ODIs vs SL due to personal reasons
– KL Rahul & Gill in contention for the leadership role in ODIs vs SL
– Test specialist likely to play in Duleep Trophy pic.twitter.com/7ea7nAKtm5— Johns. (@CricCrazyJohns) July 16, 2024
इंडिया-श्रीलंका, पहिला सामना, 27 जुलै
इंडिया-श्रीलंका, दुसरा सामना, 28 जुलै
इंडिया-श्रीलंका, तिसरा सामना, 30 जुलै
इंडिया-श्रीलंका, पहिली मॅच, 2 ऑगस्ट
इंडिया-श्रीलंका, दुसरी मॅच, 4 ऑगस्ट
इंडिया-श्रीलंका, तिसरी मॅच, 7 ऑगस्ट
दरम्यान टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यात टी 20 आणि वनडे अशा दोन्ही मालिकेत प्रत्येकी 3-3 असे एकूण 6 सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा होणार आहे.तसेच श्रीलंका दौऱ्यानंतर टीम इंडिया बांगलादेशला रवाना होणार आहे.