टीम इंडियात नक्की चाललंय काय? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना सध्याच्या घडामोडी पाहून पडलाय. वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियाच्या प्रमु खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. युवा खेळाडूंनी झिंबाब्वेचा दौरा केला. त्यानंतर आता टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टी20i आणि वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे या दौऱ्यातील एकदिवसीय मालिका खेळणार नसल्याचं म्हटलं जात होतं. मात्र हेड कोच गौतम गंभीर याच्या आवाहनानंतर दोघही खेळणार असल्याचं समोर आलं आहे.
विराट, रोहित आणि जसप्रीत बुमराह हे तिघे वनडे सीरिजमधून विश्रांती घेणार होते. मात्र गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच होताच एक्शन मोडमध्ये आलाय. टीम इंडियाला 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी खेळायची आहे. त्यासाठी टीम इंडियाकडे फक्त 10 एकदिवसीय सामनेच आहेत. त्यामुळे रोहित-विराट यासारख्या अनुभवी खेळाडूंनी वनडे सीरिजमध्ये खेळावं, अशी विनंती गंभीरने केली होती. त्यानुसार रोहित खेळणार असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता विराटनेही गंभीरच्या या विनंतीला मान देत तो खेळणार असल्याचं समोर आलं आहे. विविध मिडिया रिपोर्ट्सनुसार, विराट श्रीलंके विरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
टीम इंडिया टी 20 मालिकेने श्रीलंका दौऱ्याची सुरुवात करणार आहे. रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादव याची पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. कर्णधार म्हणून हार्दिक पंड्यापेक्षा सूर्याचं नाव आघाडीवर आणि जवळपास निश्चित आहे. तसेच या मालिकेसाठी युवा रियान पराग आणि ऋषभ पंत या दोघांचीही निवड केली जाणार असल्याचं म्हटलं जातंय. रियानने झिंबाब्वे दौऱ्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं.
टीम इंडियाच्या गोटातील घडामोडी!
INDIAN CRICKET UPDATES. [Devendra Pandey From Express Sports]
– Rohit & Virat set to play ODIs.
– Surya will lead T20I vs SL.
– Bumrah to be rested.
– Pant & Riyan Parag likely to be picked in both ODI & T20I. pic.twitter.com/OS9zjpw6W4— Johns. (@CricCrazyJohns) July 18, 2024
दरम्यान श्रीलंका दौऱ्यासाठी गुरुवारी 18 जुलै रोजी टीम इंडियाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार रोहित शर्मा वनडे आणि सूर्यकुमार यादव टी 20i मालिकेत नेतृत्व करणार आहेत. तसेच निवड समिती कोणत्या नवख्या खेळाडूंना संधी देते? याकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे.