श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात गाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे.या सामन्यातील दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा पहिला डाव हा 305 धावांवर आटोपला आहे. न्यूझीलंडला दुसऱ्या दिवशी 3 विकेट्सच्या मोबदल्यात फक्त 3 धावाच करता आल्या. श्रीलंकने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 88 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 302 धावा केल्या होत्या. मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी अवघ्या 3.5 ओव्हरमध्ये श्रीलंकेला 3 झटके देत ऑलआऊट केलं. श्रीलंकेकडून कामिंदु मेंडीस याने सर्वाधिक धावा केल्या. मेंडीसने शतकी खेळी केली. तर न्यूझीलंडच्या विलियम ओरुर्के याने 5 विकेट्स घेतल्या.
श्रीलंकेकडून पहिल्या दिवशी करुणारत्ने याचा अपवाद वगळता सर्वांनाच सुरुवात मिळाली होती. मात्र कामिंदु आणि कुसल या दोघांचा अपवाद वगळता इतर कुणालाही काही खास करता आलं नाही. करुणारत्ने याने 2 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. कामिंदुने शतक तर कुसलने अर्धशतक केलं. कामिंदुने 173 बॉलमध्ये 11 फोरसह 114 रन्स केल्या. तर कुसल मेंडीसने 68 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. तर पाथुम निसांका 27, दिनेश चांदीमल 30, अँजलो मॅथ्यूज याने 36 धावांचं योगदान दिलं. हे त्रिकुट मैदानात सेट झाले होते. मात्र यांना या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही.
कॅप्टन धनंजया डी सिल्वा याने 11 धावा केल्या. आर मेंडीसने 14 धावांचं योगदान दिलं. तर प्रभाथ जयसूर्या आणि असिथा फर्नांडो या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. न्यूझीलंडकडून विलियम ओरुर्के याव्यतिरिक्त अझाज पटेल आणि ग्लेन फिलिप्स या जोडीने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन टीम साऊथी याने 1 विकेट घेतली.
श्रीलंकेचं पहिल्या डावात ‘त्रिशतक’
Kamindu Mendis’ well-made ton powers Sri Lanka past 300 in the first innings 👏 #WTC25 | 📝 #SLvNZ: https://t.co/vJAko32DYb pic.twitter.com/2IBahYR98b
— ICC (@ICC) September 19, 2024
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा (कॅप्टन), कामिंदू मेंडिस, रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा आणि असिथा फर्नांडो.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टिम साउथी (कर्णधार), टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, एजाज पटेल आणि विल्यम ओरोरके.