श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पावसामुळे दिवसाचा खेळ हा निर्धारित वेळेआधी थांबवण्यात आला. श्रीलंकेने दुसऱ्या सामन्यावरही घट्ट पकड मिळवली आहे. श्रीलंका सलग दुसऱ्या विजयाच्या उंबरठ्यावर आहे. श्रीलंकेला विजयासाठी 5 विकेट्सची गरज आहे. श्रीलंकेने न्यूझीलंडला फॉलोऑन देत बॅटिंगसाठी भाग पाडलं. न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 41 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 199 धावा केल्या आहेत. श्रीलंका अजूनही 315 धावांनी पिछाडीवर आहे. आता श्रीलंका न्यूझीलंडला चौथ्या दिवशी झटपट गुंडाळून 2-0 ने क्लीन स्वीप देण्याच्या तयारीत आहेत.
श्रीलंकेने दुसऱ्या दिवशी पहिला डाव हा 163.4 षटकांमध्ये 5 बाद 602 धावांवर घोषित केला. श्रीलंकेकडून कामिंदू मेंडीस 182*, दिनेश चांदीमल 116 आणि कुसल मेंडीस याने 106 धावांची शतकी खेळी केली. तर इतरांनी चांगली साथ दिली. यासह पहिल्या डावात 600 पार मजल मारली. त्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावून 22 धावा केल्या होत्या. न्यूझीलंड 580 धावांनी पिछाडीवर होती.
तिसऱ्या दिवशी श्रीलंकेच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडचा खुर्दा उडवला. श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर न्यूझीलंडला 8 विकेट्सच्या मोबदल्यात फक्त 66 धावाच करता आल्या. न्यूझीलंडचा पहिला डाव हा अशाप्रकारे 88 धावांवर आटोपला. प्रभाथ जयसूर्या याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. श्रीलंकेला 514 धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे श्रीलंकेने न्यूझीलंडला फॉलोऑन देत बॅटिंगसाठी भाग पाडलं.
न्यूझीलंडची दुसऱ्या डावातील पहिल्या ओव्हरमध्ये धावांचा खातं उघडण्याआधी विकेटचं खातं उघडलं. टॉम लॅथम पहिल्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर झिरोवर आऊट झाला. त्यानंतर डेव्हॉन कॉनव्हे आणि केन विलियमसन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. धनंजया डी सिल्वा याने ही जोडी फोडू काढली आणि श्रीलंकेला दुसरी विकेट मिळवून दिली. कॉनलव्हे 61 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर श्रीलंकेने न्यूझीलंडला 24 धावांच्या मोबदल्यात 3 झटके दिले. केन विलियमसन 46, डॅरेल मिचेल 1 आणि रचीन रवींद्र 12 धावांवर बाद झाले. त्यामुळे न्यूझीलंडची स्थिती 5 बाद 121 अशी झाली. त्यानंतर टॉम ब्लंडेल आणि ग्लेन फिलीप्स या जोडीने खेळ संपेपर्यंत झुंज दिली.
न्यूझीलंडने खेळ सपेंपर्यंत 41 षटकात 5 विकेट्स गमावून 199 धावा केल्या. ग्लेन फिलीप्स आणि टॉम ब्लंडेल या जोडीने सहाव्या विकेटसाठी 78 धावांची नाबाद भागदारी केली आहे. ग्लेन 32 आणि टॉम 47 धावांवर नाबाद आहे. श्रीलंकेकडून दुसऱ्या डावात निशान पेरीस याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत. तर प्रभाथ जयसूर्या आणि कॅप्टन धनंजया डी सिल्वा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
श्रीलंका दुसऱ्या विजयाच्या उंबरठ्यावर
Early stumps on day 3, due to rain. 🌧️
Match will start 9:45AM tomorrow. 🏏#SLvNZ pic.twitter.com/iQgNwNoTTW
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 28, 2024
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टीम साऊथी (कॅप्टन) टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडीस (विकेटकीपर), मिलन प्रियनाथ रथनायके, प्रभाथ जयसूर्या, निशान पेरिस आणि असिथा फर्नांडो