श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा आणि अंतिम कसोटी सामना हा गॉल येथे खेळवण्यात येत आहे. श्रीलंकेने न्यूझीलंड विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात झाली. न्यूझीलंडने पाथुम निसांका याला 1 धावेवर बाद केलं. त्यानंतर दिमुथ करुणारत्ने आणि दिनेश चांदीमल या दोघांनी 122 धावांची भागीदारी केली. त्यानंतर दिमुथ करुणारत्ने आऊट झाला.दिमुथचं अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. दिमुथने 109 बॉलमध्ये 4 फोरसह 46 रन्स केल्या. त्यानंतर दिनेस चांदीमल आणि अँजलो मॅथ्युज या जोडीने तिसर्या विकेटसाठी 97 धावा जोडल्या. श्रीलंकेने 221 धावांवर तिसरी विकेट गमावली. दिनेश चांदीमल याला ग्लेन फिलिप्स याने क्लिन बोल्ड केलं.
दिनेशने 208 बॉलमध्ये 16 फोरसह 116 रन्स केल्या. दिनेशने या शतकी खेळीदरम्यान माजी दिग्गजाच्या विक्रमाची बरोबरी केली. दिनेशने सनथ जयसूर्या यांच्या कसोटी क्रिकेटमध्ये 50+ धावांच्या खेळीच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. दिनेशने न्यूझीलंड विरूद्धच्या या शतकी खेळीदरम्यान चौफेर फटकेबाजी केली. दिनेशने सामन्यातील 26 व्या षटकात 81 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. दिनेशच्या कसोटी कारकीर्दीतील हे 45वं अर्धशतक ठरलं. दिनेशने यासह जयसूर्याच्या विक्रमाची बरोबरी साधली.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50+ धावा करण्याचा विक्रम हा माजी कर्णधार कुमार संगकारा याच्या नावे आहेत. त्यानंतर महेला जयवर्धने दुसऱ्या, अँजलो मॅथ्यूज तिसऱ्या आणि दिमुथ करुणारत्ने चौथ्या स्थानी विराजमान आहेत. त्यानंतर दिनेश आणि सनथ जयसूर्या अनुक्रमे पाचव्या क्रमांकावर आहेत.
कुमार संगकारा – 90
महेला जयवर्धने – 84
अँजलो मॅथ्यूज – 59
दिमुथ करुणारत्ने – 55
दिनेश चांदीमल – 45
सनथ जयसूर्या – 45
दिनेश चांदीमलची शतकी खेळी
Dinesh Chandimal notches up his 16th Test century, leading the charge for Sri Lanka against New Zealand! Can he convert this into a double hundred? 💪 #SLvNZ pic.twitter.com/wWPtBDUtjc
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 26, 2024
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टीम साऊथी (कॅप्टन) टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडीस (विकेटकीपर), मिलन प्रियनाथ रथनायके, प्रभात जयसूर्या, निशान पेरिस आणि असिथा फर्नांडो.