श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. न्यूझीलंड 580 धावांनी पिछाडीवर आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेच्या 602 धावांच्या प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत 14 षटकांमध्ये 2 विकेट्स गमावून 22 धावा केल्या आहेत. केन विलियमसन 6 आणि एझाज पटेल 0 वर नाबाद परतले आहेत. तर टॉम लॅथम 2 आणि डेव्हॉन कॉनव्हे 9 धावा करुन स्वस्तात माघारी परतले. श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो आणि प्रभाथ जयसूर्या या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. आता श्रीलंका तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडला झटपट गुंडाळून फॉलोऑन देणार का? याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान त्याआधी श्रीलंकेने गॉल कसोटीत न्यूझीलंड विरुद्ध एका डावात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम केला. श्रीलंकेने न्यूझीलंड विरुद्ध 600 पार मजल मारली. श्रीलंकेने पहिला डाव हा 163.4 ओव्हरमध्ये 602-5 धावांवर घोषित केला. श्रीलंकेने त्रिकुटाने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर 600 पेक्षा अधिक धावा केल्या. श्रीलंकेकडून कामिंदु मेंडीस, दिनेश चांदीमल आणि कुसल मेंडीस या त्रिकुटाने शतकी खेळी केली. तर पाथुम निसांका याचा अपवाद वगळता इतर तिघांनीही चांगली साथ देत श्रीलंकेला 600 पार पोहचवण्यात निर्णायक योगदान दिलं. तर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अक्षरक्ष: श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले.
पाथुम निसांका याने 1 धाव करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. दिमुथ करुणारत्ने याने 46 धावा केल्या.दिनेश चांदीमल याने 208 बॉलमध्ये 116 रन्स केल्या. अँजलो मॅथ्यूजचं शतक अवघ्या 12 धावांनी हुकलं. मॅथ्यूजने 88 धावा केल्या. तर कॅप्टन धनंजया डी सिल्वा याने 44 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर कुसल मेंडीस आणि कामिंदु मेंडीस या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद 200 धावांची भागादारी केली. त्यानंतर कॅप्टन धनंजया डी सिल्वा याने डाव घोषित केला. कुसलने 149 बॉलमध्ये 6 फोर आणि 3 सिक्ससह नॉट आऊट 196 रन्स केल्या. तर कामिंदुने 250 चेंडूत 16 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 182 धावा केल्या. कामिंदुला द्विशतकसाठी 18 धावा हव्या असताना डाव घोषित केल्याने चाहत्यांनी नाराजीही व्यक्त केली. न्यूझीलंडकडून ग्लेन फीलीप्स याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन टीम साऊथीने 1 विकेट घेतली.
दुसरा दिवस श्रीलंकेच्या नावावर
Sri Lanka stacked up the runs and then took out New Zealand’s openers with the ball to finish Day 2 in control 💪 #WTC25 | 📝 #SLvNZ: https://t.co/b2umg6CHuP pic.twitter.com/cfa0U1Fqep
— ICC (@ICC) September 27, 2024
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टीम साऊथी (कॅप्टन) टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडीस (विकेटकीपर), मिलन प्रियनाथ रथनायके, प्रभाथ जयसूर्या, निशान पेरिस आणि असिथा फर्नांडो.