श्रीलंकेने न्यूझीलंड दौऱ्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडला 2-0 ने लोळवलं आहे. तिसऱ्या सामन्यातही श्रीलंकेचं पारडं जड असल्याचं दिसत आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं. पहिल्या दोन्ही सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे टार्गेट डकवर्थ लुईस नियमानुसार सेट करण्यात आलं होतं. पहिल्या सामन्यात श्रीलंकेने 45 धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात 3 विकेट आणि 6 चेंडू राखून विजय मिळवला. कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की, “आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत, कदाचित थोडी अधिक चांगली विकेट असेल. कदाचित बोर्डवर चांगला स्कोअर करू आणि तो जिंकण्याचा प्रयत्न करू. आम्हाला मालिका दमदारपणे संपवायची आहे. आम्ही शेवटच्या सामन्यात कमी पडलो आणि आमच्यासाठी चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. आमच्या संघात दोन बदल आहेत.” श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंका म्हणाला की, “आम्हाला मालिका 3-0 ने जिंकायची आहे पण त्याचवेळी आम्ही आज काही नवीन मुलांना खेळण्याची संधी देत आहोत. आमच्या संघात पाच बदल आहेत.”
चामिंडू विक्रमसिंघे आज वनडे पदार्पण करत आहे. तो एक सीम-बॉलिंग अष्टपैलू खेळाडू आहे. डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताने गोलंदाजी करतो. श्रीलंकेचा कर्णधार असलंका याने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर त्यांच्या बेंच स्ट्रेंथची चाचणी करेल असे सांगितलं होतं. दिलेल्या शब्दाप्रमाणे पाच बदल केले आहे. मदुष्का, मदुशांका, नुवानिडू, शिराज आणि विक्रमसिंघे यांना प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली आहे. तर न्यूझीलंडने देखील दोन बदल केले आहेत. टी20 क्रिकेटमध्ये छाप पाडणारा फॉल्क्सचे वनडेत पदार्पण झालं आहे. तसेच मिल्ने देखील प्लेइंग 11 मध्ये आहे.
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): विल यंग, टिम रॉबिन्सन, हेन्री निकोल्स, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मिच हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), इश सोधी, झकरी फॉल्केस, ॲडम मिल्ने.
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): निशान मदुष्का, अविष्का फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, सदीरा समरविक्रमा (विकेटकीपर), चरिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, चामिंडू विक्रमसिंघे, महेश थेक्षाना, जेफ्री वेंडरसे, दिलशान मदुशंका, मोहम्मद शिराज.