श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 2 टी 20I सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली. त्यानंतर आता उभयसंघात एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. श्रीलंका टीम सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. श्रीलंका न्यूझीलंडला चितपट करण्यासाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड आपला फॉर्म कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. चरिथ असलंका हा श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तर मिचेल सँटनर याच्याकडे न्यूझीलंडचं कर्णधारपद सांभाळणार आहे. हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल? हे जाणून घेऊयात.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 102 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. न्यूझीलंडने या 102 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडने 52 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेने 41 वेळा पलटवार केला आहे. तर 8 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड पहिला सामना बुधवारी 13 नोव्हेंबरला होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड पहिला सामना रणगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला येथे होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड पहिला सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर लाईव्ह सामना पाहायला मिळेल.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड पहिला सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 2 वाजता टॉस होणार आहे.
वनडे सीरिजसाठी न्यूझीलंड टीम: मिचेल सँटनर (कॅप्टन), टिम रॉबिन्सन, विल यंग, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिच हे (विकेटकीपर), जोश क्लार्कसन, झकरी फॉल्केस, ईश सोधी, जेकब डफी, ॲडम मिल्ने, हेन्री निकोल्स, नॅथन स्मिथ आणि डीन फॉक्सक्रॉफ्ट.
श्रीलंका टीम: चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, महेश थेक्षाना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशांका, दुशान हेमनका, दुशान निशांका वेललागे, जेफ्री वेंडरसे, चामिंडू विक्रमसिंघे आणि मोहम्मद शिराज.