न्यूझीलंडचं श्रीलंकेसमोर फक्त 108 धावांचं आव्हान, मालिकेत क्लिन स्विप देण्याची संधी

| Updated on: Nov 10, 2024 | 9:04 PM

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात दुसरा टी20 सामना सुरु आहे. मालिकेत नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला असं म्हणावं लागेल. कारण न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.

न्यूझीलंडचं श्रीलंकेसमोर फक्त 108 धावांचं आव्हान, मालिकेत क्लिन स्विप देण्याची संधी
Follow us on

न्यूझीलंडवर दुसऱ्या टी20 सामन्यातही पराभवाचं सावट ओढावलं आहे. दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत श्रीलंकेने आधीच 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका बरोबरीत सोडवण्याचा मोठं आव्हान न्यूझीलंडवर होतं. पण न्यूझीलंडने दुसऱ्या टी20 सामन्यातही अपेक्षित कामगिरी केली नाही. मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. इतकंच काय तर टप्प्याटप्प्याने फलंदाज तंबूत परत होते. त्यामुळे 100 आकडा तरी गाठणार का? हा प्रश्न होता. मात्र तळाशी आलेल्या जोश क्लार्कसनने त्यातल्या त्यात चांगली कामगिरी केली आणि धावा 100 च्या पार पोहोचवण्यास मदत केली. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा जबरदस्त गोलंदाजी केली. 4 षटकांपैकी एक षटक निर्धाव टाकलं तसेच फक्त 17 धावा देत 4 गडी बाद केले. यावेळी इकोनॉमी रेट हा फक्त 4.20 इतका होता. त्यानंतर नुवान तुषाराच्या गोलंदाजीचा सामना करणंही न्यूझीलंडला अवघड गेलं. त्याने 4 षटकात 22 धावा देत दोन गडी बाद केले. यावेळी त्याने चार षटकात 5.50 च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या. मथीशा पथिराननेही चांगली गोलंदाजी केली त्याने 4 षटकांपैकी एक षटक निर्धाव टाकलं. तसेच फक्त फक्त 11 धावा देत तीन गडी बाद केले. यावेळी त्याच्या गोलंदाजीचा इकोनॉमी रेट हा फक्त 2.80 इतका होता.

न्यूझीलंडने 19.3 षटकात सर्व गडी बाद 108 धावा केल्या आणि विजयासाठी 109 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान श्रीलंकेसाठी सोपं असेल असंच दिसत आहे. त्यामुळे श्रीलंका आता हे आव्हान गाठणार की नाही याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. न्यूझीलंडकडून विल यंगने सर्वाधिक 30 धावा केल्या. तर जोश क्लार्कसनने 24 धावांची खेळी केली.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टिम रॉबिन्सन, विल यंग, ​​मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिच हे (विकेटकीपर), जोश क्लार्कसन, मिचेल सँटनर (कर्णधार), ईश सोधी, झकरी फौल्केस, लॉकी फर्ग्युसन.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरिथ असलंका (कर्णधार), भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, नुवान तुषारा