SL vs NZ : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, न्यूझीलंडच्या ‘त्या’ खेळाडूच्या कामगिरीने WTC मधील भारताचा मार्ग सुखर

| Updated on: Mar 11, 2023 | 3:09 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम फेरीमध्ये भारताला आपलं स्थान निश्चित करण्यासाठी विजय मिळवणं गरजेचं आहे. मात्र जर भारताचा पराभव झाला तर सर्व काही जर तर अवलंबून राहत आहे.

SL vs NZ : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, न्यूझीलंडच्या त्या खेळाडूच्या कामगिरीने WTC मधील भारताचा मार्ग सुखर
Follow us on

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर गावसकर मालिकेमधील चौथा आणि शेवटचा सामना सुरू आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम फेरीमध्ये भारताला आपलं स्थान निश्चित करण्यासाठी विजय मिळवणं गरजेचं आहे. मात्र जर भारताचा पराभव झाला तर सर्व काही न्यूझीलंड आणि श्रीलंकेमधील कसोटी मालिकेवर अवलंबून राहत आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंकेमधील सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या निकालावर भारताचं जाणं निश्चित होणार आहे. अशातच टीम इंडियसाठी आनंदाची बातमी म्हणजे न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेल याच्या शतकाच्या जोरावर किवींनी सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे.

श्रीलंकेने पहिल्या डावात 355 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात 373 धावा करत 18 धावांची आघाडी घेतली आहे. डॅरिल मिशेलने केलेल्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडला 300 धावांचा टप्पा पार करत आघाडी घेता आली. मिचेलने त्याचं कसोटी कारकिर्दीतील 5वं वैयक्तिक शतक झळकावलं.

न्यूझीलंडला 373 धावांवर गुंडाळताना श्रीलंकेच्या असिथा फर्नांडो याने सर्वाधिक 4 बळी तर लाहिरू कुमार याने 3 बळी घेतले. श्रीलंकेच्या दुसऱ्या डावाला सरूवात झाली असून सलामीवीर ओशाडा फर्नांडो 28 धावा, दिमुथ करूनारत्ने 17 धावा आणि कुसल मेंडिस 14 धावा करून स्वस्तात परतले आहेत. ब्लेअर टिकनर याने तिन्ही बळी घेत सामन्यावर पकड मिळवली. त्यामुळे आत चौथ्या दिवशी श्रीलंकेला झटपट गुंडाळून सामना खिशात घालण्याचा किवींचा प्रयत्न असेल.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना जिंकला तर टीम इंडिया थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. जर हा सामना अनिर्णित राहिला किंवा भारत हरला, तर टीम इंडियाचे WTC च्या अंतिम फेरीत जाणं हे NZ vs SL मालिकेवर अवलंबून आहे. या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने एकही सामना जिंकला तर भारत WTC फायनलमध्ये प्रवेश करेल. न्यूझीलंड संघाची आताची सामन्यावरील पकड पाहता सामना जिंकतील असं वाटत आहे.