गाले | श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या पहिल्या साम्यान्यातील पहिल्या डावात श्रीलंकेने 312 धावा केल्या. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची खराब सुरुवात झालीय. पाकिस्तानचा अर्धा संघ हा अवघ्या 101 धावांवर माघारी परतला आहे. पाकिस्तान कॅप्टन बाबर आझम हा देखील झटपट आऊट झाला. बाबर 16 धावांवर आऊट झाला. बाबर श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्या याच्यासमोर पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. प्रभातने बाबरला चौथ्यांदा आऊट केलंय.
प्रभातने सामन्यातील 15 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर बाबरला आऊट केलं. पाकिस्तानला बाबरच्या रुपात चौथा झटका लागला. प्रभातने टाकलेल्या लेंथ बॉलवर बाबर फसला आणि कॅच आऊट झाला. बाबरचा आऊट झाल्यानंतर एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हीडिओत बाबर पॅव्हेलियनमध्ये डोक्यावर हात मारताना दिसतोय.
बाबरवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
Following the early Collapse, Babar Azam is unhappy.
pic.twitter.com/L1eAlrKqzS— Nawaz ?? (@Rnawaz31888) July 17, 2023
दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार बाबर आझम हा आयसीसी टेस्ट बॅटिंग रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. या यादीच अव्वल स्थानी केन विलियमन्स आहे. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड आहे. त्यानंतर बाबर तिसऱ्या क्रमांकावर आहे. बाबरने थेट 3 स्थानांची मोठी झेप घेत तिसरं स्थान पटकावलं. बाबरला या सामन्यात चांगली खेळी करुन केन आणि हेड या दोघांना मागे टाकण्याची संधी होती. मात्र त्यात बाबरला अपयश आलं. मात्र या सामन्यात पाकिस्तानचा दुसरा डाव बाकी आहे. त्यामुळे बाबर या डावात कशी कामगिरी करतो, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन | दिमुथ करुणारत्ने (कॅप्टन), निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, दिनेश चंडिमल, सदीरा समरविक्रमा (विकेटकीपर), रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, विश्व फर्नांडो आणि कसून रजिथा.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद, सौद शकील, सरफराज अहमद (विकेटकीपर), आगा सलमान, नौमान अली, अबरार अहमद, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह.