WI vs SL T20: श्रीलंकेचं वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 163 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?

| Updated on: Oct 15, 2024 | 8:38 PM

वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने 20 षटकात 5 गडी गमवून 162 धावा केल्या. वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं आहे.

WI vs SL T20: श्रीलंकेचं वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 163 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
Image Credit source: Twitter
Follow us on

श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा टी20 सामना सुरु आहे. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी श्रीलंकेला विजय महत्वाचा आहे. तर वेस्ट इंडिजने हा सामना जिंकला तर मालिका खिशात घालेल. दरम्यान, दुसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला. खेळपट्टी फिरकीला मदत करणारी असल्याने श्रीलंकेने फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेने 20 षटकात 5 गडी गमवून 162 धावा केल्या आणि वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं. श्रीलंकेकडून पथुम निस्संकाने चांगली खेळी केली. 49 चेंडूत 9 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 54 धावा केल्या. तर कुसल मेंडिसने 26 आणि कुसल परेराने 24 धावा केल्या. कामिंदु मेंडिस आणि चरीथ असलंका काही खास करू शकले नाहीत. कामिंदु मेंडिस 19 धावांवर बाद झाला. तर चरिथ असलंका 9 धावा करून तंबूत परतला. भानुका राजापक्षेने 7 चेंडूत नाबाद 5 धावा केल्या. तर वानिंदु हसरंगाने 2 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने नाबाद 5 धावांची खेळी केली.

वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ, रोमारियो शेफर्ड आणि शामर स्प्रिंगर हे गोलंदाज यशस्वी ठरले. रोमारियो शेफर्डने 3 षटाकत 23 धावा देत 2 गडी बाद केले. तर अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ आणि शामर स्प्रिंगरने प्रत्येकी एक गडी बाद केला.

पहिल्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजने बाजी मारली होती. तेव्हा श्रीलंकेने 20 षटकात 7 गडी गमवून 179 धावा केल्या होत्या. हे आव्हान श्रीलंकेने 5 गडी गमवून 19.1 षटकात पूर्ण केलं होतं. मालिकेतील शेवटचा सामना 17 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे तीन सामन्यातील टी20 मालिकेत बरोबरी साधायची असेल तर हा सामना श्रीलंकेला काही करून जिंकावाच लागेल.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): ब्रँडन किंग, एविन लुईस, आंद्रे फ्लेचर (विकेटकीपर), रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), रोमॅरियो शेफर्ड, शमर स्प्रिंगर, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटी, शामर जोसेफ

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असलंका (कर्णधार), भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, नुवान थुशारा.