SL vs WI T20 : टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने, घेतला असा निर्णय

| Updated on: Oct 15, 2024 | 7:08 PM

श्रीलंका वेस्ट इंडिज यांच्या तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजने जिंकला असून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता श्रीलंकेसाठी मालिका वाचवण्यासाठी हा सामना काहीही करून जिंकावाच लागणार आहे. तर हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा वेस्ट इंडिजचा प्रयत्न असेल.

SL vs WI T20 : टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने, घेतला असा निर्णय
Image Credit source: Twitter
Follow us on

वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्या तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून वेस्ट इंडिजने पकड मिळवली आहे. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेला कमबॅक करायचं आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही खेळपट्टी फिरकीला मदत करणारी असल्याचं दिसत आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं त्याने सांगितलं. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंका म्हणाला की, “आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. फलंदाजांसारखेच काम आम्हाला करावे लागेल. मागच्या सामन्याच्या तुलनेत ही खेळपट्टी या खेळपट्टीवर 160-170 इतकी धावसंख्या खूप असेल. आमच्या संघात दोन बदल केले आहेत.” lj वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेल म्हणाला की, ही खेळपट्टी थोडी वेगळी दिसत आहेआणि आम्हाला चांगले खेळावे लागेल. आम्ही शेवटच्या सामन्यात बॅट आणि बॉल दोन्हीने चांगली कामगिरी केली आणि त्यामुळे आम्हाला चांगली कामगिरी करण्याची आणखी एक संधी मिळाली. आम्ही श्रीलंकेला धक्का देत राहू अशी आशा आहे. दुर्दैवाने, शाई होप सामन्यात नाही आणि त्याच्या जागी आंद्रे फ्लेचर आला आहे.”

दोन्ही संघांची प्लेइंग 11

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असलंका (कर्णधार), भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, नुवान थुशारा.

वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): ब्रँडन किंग, एविन लुईस, आंद्रे फ्लेचर (विकेटकीपर), रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), रोमॅरियो शेफर्ड, शमर स्प्रिंगर, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटी, शामर जोसेफ