World Cup 2023, PAK vs SL : हैदराबादमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी! व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

| Updated on: Oct 11, 2023 | 2:51 PM

World Cup 2023, PAK vs SL : हैदराबादमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना पार पडला. हा सामना पाकिस्तानने 6 गडी राखून जिंकला. पण या सामन्यात पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाली. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.

World Cup 2023, PAK vs SL : हैदराबादमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी! व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ
World Cup 2023, PAK vs SL : पाकिस्तानच्या समर्थनार्थ हैदराबाद स्टेडियममध्ये घोषणाबाजी! व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने दमदार सुरुवात केली आहे. पहिल्यांदा नेदरलँड आणि त्यानंतर श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली. श्रीलंकेनं 344 धावा करत 345 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. पण पाकिस्तानने हे आव्हान 4 गडी गमवून पूर्ण केलं. पण या सामन्यात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. याबाबतची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 55,000 प्रेक्षक क्षमतेचं मैदानात पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरं तर हे स्टेडियम पूर्ण भरलंही नव्हतं. पण जितके लोकं आले होते त्यापैकी जास्तीत जास्त लोकं हे पाकिस्तानचं समर्थन करत होते. इतकंच काय तर पाकिस्तानच्या विजयानंतर समर्थनार्थ घोषणाबाजी झाली. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटल आहे. खरं तर भारतात पाकिस्तानी संघाला समर्थन अपेक्षित नाही. असं असूनही हैदराबादमध्ये असं चित्र दिसलं.

पाकिस्तानी चाहत्यांना भारतात येण्याचा विजा मिळाला नाही. त्यामुळे पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम याने भारतात येताच समर्थन देण्याचं आवाहन केलं होतं. हैदराबादमध्ये ‘जीतेगा भाई जीतेगा पाकिस्तान जीतेगा’ अशी घोषणाबाजी ऐकून बाबर सेनेचं चांगलंच प्रोत्साहन मिळालं. त्यामुळे सामन्यानंतर बाबर आझम याने लोकांचे आभार मानले. पण व्हायरल होत असलेला व्हिडीओ खरा की खोटा याबाबत अजूनही स्पष्टता नाही.

या सामन्यानंतर बाबर आझम आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हैदराबाद स्टेडियममधील ग्राउंड स्टाफसोबत फोटोही काढला. तसेच त्यांना जर्सी भेट दिली. याबाबतचं ट्वीट पाकिस्तान क्रिकेटनं केलं आहे.

वर्ल्डकपमध्ये सलग दोन विजय मिळवत पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर भारताचा दुसरा सामना अफगाणिस्तानसोबत होत आहे. या सामन्यातील विजयानंतर टीम इंडियाला दुसरं स्थान काबीज करता येऊ शकतं. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ 14 ऑक्टोबरला आमनेसामने उभे ठाकणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे.