Har vs Mum | अजिंक्य रहाणे याची चाबूक खेळी, मुंबईचा हरयाणावर 8 विकेट्सने रुबाबदार विजय

| Updated on: Oct 16, 2023 | 10:40 PM

Haryana vs Mumbai Smat 2023 | अजिंक्य रहाणे याने आपल्या तडाखेदार खेळीच्या जोरावर हरयाणाला नेस्तानाबूत केलं. रहाणेने जबरदस्त खेळी करत मुंबईला विजय मिळवून दिला.

Har vs Mum | अजिंक्य रहाणे याची चाबूक खेळी, मुंबईचा हरयाणावर 8 विकेट्सने रुबाबदार विजय
Follow us on

जयपूर | कॅप्टन अजिंक्य रहाणे याच्या तडाखेदार खेळीच्या जोरावर मुंबई टीमने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. मुंबईने हरयाणावर डकवर्थ लुईस नियमानुसार 8 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला. हरयाणाने 18 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून147 धावा केल्या. मुंबईने विजयी धावांचा पाठलाग करताना 15.5 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 149 धावा केल्या. रहाणे मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. तर शिवम दुबे याने रहाणेला चांगली साथ दिली.

मुंबईकडून रहाणेने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. रहाणेने 43 बॉलमध्ये 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 76 धावा केल्या. रहाणेने फक्त सिक्स आणि फोरच्या माध्यमातून 42 धावा केल्या. तर शिवम दुबे याने 20 बॉलमध्ये नाबाद 26 रन्सची खेळी केली. आंग्रश रघुवंशी याने 26 धावांचं योगदान दिलं. तर यशस्वी जयस्वाल 12 धावांवर आऊट झाला.

यशस्वी आणि आंग्रश या सलामी जोडीने 14 धावांची भागीदारी केली. यशस्वी 12 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर कॅप्टन रहाणे आणि आंग्रश या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 80 धावांची पार्टनरशीप केली. यानंतर आंग्रश 26 धावा करुन आऊट झाला. युझवेंद्र चहलने आंग्रशला आऊट केलं. त्यानंतर शिवम दुबे आला. शिवमने रहाणेला चांगली साथ दिली. रहाणे-दुबे या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 55 धावांची नाबाद विजयी भागीदारी रचली.

अजिंक्य रहाणेने या दरम्यान अर्धशतक झळकावलं. रहाणेने जोरदार फटकेबाजी करत हरयाणाच्या गोलांदाजांना झोडून काढलं. तर दुसऱ्या बाजूने शिवम यानेही संधी मिळेल तेव्हा मोठे फटके मारले. हरयाणाकडून चहल आणि अंशुल कंबोज या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

हरयाणाची बॅटिंग

त्याआधी हरयाणाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. हरयाणाकडून हर्षल पटेल 38, अंकीत कुमार 36 आणि निशांत सिंधू याने नाबाद 30 धावा केल्या. तर अखेरीस राहुल तेवतिया याने नॉट आऊट 18 रन्स केल्या. हरयाणाने या चौघांच्या खेळीच्या जोरावर 18 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 147 धावांपर्यंत मजल मारली. मुंबईकडून तनुश कोटीयन याने 3 विकेट्स घेतल्या. तर मोहित अवस्थी याने 2 विकेट्स पटकावल्या.

मुंबईचा विजय

मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सर्फराज खान, शिवम दुबे, शम्स मुलाणी, प्रसाद पवार (विकेटकीपर), तनुष कोटियन, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, आंग्रश रघुवंशी आणि मोहित अवस्थी.

हरयाणा प्लेईंग ईलेव्हन | हिमांशू राणा (कॅप्टन), अंकित कुमार, निशांत सिंधू, राहुल तेवतिया, सर्वेश रोहिल्ला (विकेटकीपर), जयंत यादव, मोहित शर्मा, हर्षल पटेल, अमित मिश्रा, युझवेंद्र चहल, अंशुल कंबोज आणि सुमित कुमार.