जयपूर | अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबई क्रिकेट टीम सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023 स्पर्धेत धमाकेदार सुरुवात केलीय. मुंबईने गेल्या 24 तासात सलग दुसरा विजय मिळवला आहे. मुंबईने हरयाणाला 8 विकेट्सने तुडवल्यानंतर आता मेघालयाचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. कल्याणचा तुषार देशपांडे मुंबईच्या विजयाचा हिरो ठरलाय. तुषारच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर मेघालयला 20 ओव्हरमध्ये 9 बाद 65 धावांवर रोखलं. त्यानंतर मुंबईने 66 धावांचं आव्हान हे 1 विकेट गमावून 9.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. यशस्वी जयस्वाल याने 21 धावांची खेळी केली. तर आंगकृष्ण रघुवंशी आणि अजिंक्य रहाणे या जोडीने 37 धावांची विजयी भागीदारी केली. रघुवंशी याने नाबाद 32 आणि रहाणेने नॉट आऊट 8 रन्स केल्या. तर मेघालयचा कॅप्टन राजेश बिश्नोई याने एकमेवर विकेट घेतली.
मुंबईने टॉस जिंकून मेघालयला बॅटिंगसाठी बोलावलं. तुषारने मेघालयला डावातील दुसऱ्याच ओव्हरमध्ये 2 झटके देत मुंबईला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी मेघालयवर अखेर घट्ट पकड धरुन ठेवली. मुंबईच्या धारदार बॉलिंगसमोर मेघालयला अखेरपर्यंत काहीच करता आलं नाही. मेघालयच्या तिघांनी भोपळा फोडता आला नाही. चौघांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं. राम गुरुंग 4 धावांवर नाबाद परतला. आकाश चौधरी याने दुसऱ्या सर्वाधिक 11 धावा केल्या. तर अनिश चरक याने नाबाज 20 धावा केल्या. अनिशच्या या खेळीमुळे मेघालयला 50 पार जाता आलं.
मुंबईकडून तुषार देशपांडे याने अवघ्या 3 ओव्हर बॉलिंग केली. त्यापैकी 1 ओव्हर मेडन टाकली. तुषार 16 धावांच्या मोबदल्यात सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. शम्स मुलानी याने 2 विकेट्स घेत तुषारला चांगली साथ दिली. तर शिवम दुबे आणि तनुष कोटियन या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢 𝐦𝐚𝐤𝐞 𝐢𝐭 2⃣ 𝐢𝐧 2⃣👌
Another comprehensive win as they chase down 66 from 9.4 overs to beat Meghalaya by 9 wickets.#MEGvMUM | #SMAT | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/7oMUsm0zVk pic.twitter.com/jPvyrwWEqP
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 17, 2023
मुंबईचा हा गेल्या 24 तासांमधला सलग दुसरा विजय ठरला आहे. मुंबईने 16 ऑक्टोबरला हरयाणावर डकवर्थ लुईस नियमानुसार 8 विकेट्सने विजय मिळवला होता. दरम्यान मुंबईला आपला तिसरा सामना हा आता 19 नोव्हेंबरला बडोदा विरुद्ध खेळणार आहे.
मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शम्स मुलाणी, शिवम दुबे, सर्फराज खान, प्रसाद पवार (विकेटकीपर), तनुष कोटियन, आंगकृष्ण रघुवंशी, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे आणि मोहित अवस्थी.
मेघालय प्लेईंग ईलेव्हन | एरियन संगमा, नकुल हरपाल वर्मा (विकेटकीपर), मेवाडा शिल्ला, सिल्वेस्टर मायलीम्पदाह, लॅरी संगमा, राजेश बिश्नोई (कॅप्टन), अमिंगशु सेन, अनिश चरक, आकाश चौधरी, राम गुरुंग आणि चेंगकम संगमा.