टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 22 नोव्हेंबरपासून होणार आहे. या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली मॅच पर्थ येथे होणार आहे. तर 24 आणि 25 नोव्हेंबरपासून आयपीएल 2025 मेगा ऑक्शन होणार आहे. या दोन्ही मोठ्या इव्हेंटकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. अशात भारतीय क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियापासून गेली अनेक वर्ष दूर असलेला घातक गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला गूड न्यूज मिळाली आहे. भुवनेश्वर कुमारला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला 23 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने संघ जाहीर केला आहे. यूपीसीएने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. यूपीसीए निवड समितीने एकूण 19 सदस्यीय संघ जाहीर केलाय. भुवनेश्वर कुमारला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर माधव कौशिक उपकर्णधारपद सांभाळणार आहे. त्याशिवाय टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंह, समीर रिझवी, पीयूष चावला, यश दयाल आणि नितीश शर्मा या खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.
यूपी या स्पर्धेतील साखळी फेरीत एकूण 7 सामने खेळणार आहे. यूपी या स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात 23 नोव्हेंबरपासून दिल्ली विरूद्धच्या सामन्याने करणार आहे. यूपीचा या स्पर्धेत सी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे.
यूपी विरुद्ध दिल्ली, शनिवार, 23 नोव्हेंबर
यूपी विरुद्ध हिमाचल प्रदेश, सोमवार 25 नोव्हेंबर
यूपी विरुद्ध मणिपूर, बुधवार 27 नोव्हेंबर
यूपी विरुद्ध हरयाणा, शुक्रवार 29 नोव्हेंबर
यूपी विरुद्ध अरुणाचल प्रदेश, रविवार 1 डिसेंबर
यूपी विरुद्ध जम्मू-काश्मीर, मंगळवार 3 डिसेंबर
यूपी विरुद्ध झारखंड, गुरुवार, 5 डिसेंबर
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी यूपी संघ जाहीर
Our best and brightest are ready for the #SyedMushtaqAliTrophy! Wishing them all the best, let’s bring it home boys. #SyedMushtaqAli #UPCricket #UPCA pic.twitter.com/e1EFLrInxJ
— UPCA (@UPCACricket) November 18, 2024
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी उत्तर प्रदेश टीम : भुवनेश्वर कुमार (कॅप्टन), माधव कौशिक, करन शर्मा, रिंकू सिंह, नीतीश राणा, समीर रिज्वी, स्वास्तिक चिकारा, प्रियम गर्ग, आर्यन जुयाल, आदित्य शर्मा, पीयूष चावला, विपराज निगम, कार्तिकेय जयसवाल, शिवम शर्मा, यश दयाल, मोहसिन खान, आकिब खान, शिवम मावी आणि विनीत पंवार.