Prithvi Shaw : 5 पैकी 2 सामन्यांत भोपळा, पृथ्वी शॉ फ्लॉप

| Updated on: Dec 03, 2024 | 4:19 PM

Prithvi Shaw Duck : पृथ्वी शॉ आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला. त्यानंतर आता तो सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेत 5 सामन्यांमध्ये 2 वेळा झिरोवर आऊट झाला आहे.

Prithvi Shaw : 5 पैकी 2 सामन्यांत भोपळा, पृथ्वी शॉ फ्लॉप
Prithvi Shaw Duck Smat
Follow us on

टीम इंडियापासून गेली अनेक महिने दूर असलेला युवा मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉ आयपीएल मेगा ऑक्शन 2025 मध्ये अनसोल्ड राहिला. पृथ्वीने त्याची बेस प्राईज 75 लाख रुपये इतकी ठेवली होती. मात्र त्यानंतरही पृथ्वीला कुणी घेण्यात रस दाखवला नाही. पृथ्वी गेल्या काही महिन्यात क्रिकेटपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत राहिलाय. त्याचाच फटका त्याच्या कामगिरीवर झालाय, असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. पृथ्वीला आता धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. सध्या देशातील विविध ठिकाणी सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफी स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत पृथ्वी 2 वेळा झिरोवर आऊट झाला आहे.

हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये 3 डिसेंबरला मुंबई विरुद्ध सर्व्हिसेस यांच्यातील सामन्यात पृथ्वी पहिल्या डावात भोपळा न फोडता माघारी परतला. पृथ्वीची ही या स्पर्धेतील 5 सामन्यांमधील झिरोवर आऊट होण्याची दुसरी वेळ ठरली. पृथ्वी याआधी 27 नोव्हेंबरला महाराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात भोपळा न फोडता माघारी परतला होता.

हे सुद्धा वाचा

मोठी खेळी करण्यात अपयश

पृथ्वीच्या या 2 भोपळ्यांचा अपवाद वगळता युवा फलंदाजाला इतर 3 सामन्यांमध्ये अपेक्षित आणि आश्वासक सुरुवात मिळाली. मात्र त्याला त्या खेळीचा मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. पृथ्वीने गोव्याविरुद्ध 33, केरळविरुद्ध 23 तर नागालँडविरुद्ध 40 धावा केल्या. मात्र त्याला अर्धशतकापर्यंत पोहचण्यात अपयश आलं.

पृथ्वीची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील 5 सामन्यांमधील धावा

विरुद्ध गोवा : 33 धावा

विरुद्ध महाराष्ट्र : 0

विरुद्ध केरळ : 23 धावा

विरुद्ध नागालँड : 40 धावा

विरुद्ध सर्व्हिसेस : 0

5 सामने 2 भोपळे

सर्व्हिसेस प्लेइंग इलेव्हन : मोहित अहलावत (कॅप्टन आणि विकेटकीपर), कुंवर पाठक, नितीन तन्वर, मोहित राठी, गौरव कोचर, विनीत धनखर, अमित शुक्ला, विकास उमेश यादव, पूनम पुनिया, विशाल गौर आणि विकास हातवाला.

मुंबई प्लेइंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, शम्स मुलाणी, सूर्यांश शेडगे, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन आणि मोहित अवस्थी.