MUM vs SER : शार्दुलच्या चौकारासह मुंबईचा विजयी ‘फोर’, सर्व्हिसेसवर 39 धावांनी मात

| Updated on: Dec 03, 2024 | 5:01 PM

Services vs Mumbai Match Result : शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि शार्दूल ठाकुर हे त्रिकुट मुंबईच्या विजयाचे हिरो ठरले. शिवम-सूर्याने अर्धशतकी खेळी केल्यांनतर शार्दूलने 4 विकेट्स घेतल्या.

MUM vs SER : शार्दुलच्या चौकारासह मुंबईचा विजयी फोर, सर्व्हिसेसवर 39 धावांनी मात
shardul thakur 4 wickets against services smat 2024
Follow us on

श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत सर्व्हिसेसविरुद्ध 39 धावांनी मात केली आहे. मुंबईने सर्व्हिसेसला विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र आव्हानाच्या जवळ जाणं सोडा सर्व्हिसेस टीमला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. मुंबईच्या धारदार गोलंदाजीसमोर सर्व्हिसेसचा डाव 19.3 ओव्हरमध्ये 153 धावांवर आटोपला. मुंबईकडून शार्दूल ठाकुर याने 4 विकेट्स घेतल्या. मुंबईचा हा या स्पर्धेतील 5 व्या सामन्यातील चौथा विजय ठरला.

दुसरा डाव

सर्व्हिसेसकडून कॅप्टन मोहित अहलावत याने 54 धावांची खेळी केली. तर विकास हाथवाला 22 आणि मोहित राठी याने 20 धावांचं योगदान दिलं. तिघांना भोपळाही फोडता आला नाही. तर उर्वरित इतरांना 19 च्या पुढे मजल मारता आली नाही. शार्दूल ठाकुरने 4 ओव्हरमध्ये 25 रन्स देत 4 विकेट्स घेतल्या. शम्स मुलानीने तिघांना बाद केलं. तर मोहित अवस्थी आणि शिवम दुबे या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत दोघांना चांगली साथ दिली.

मुंबईची बॅटिंग

मुंबईला टॉस गमावल्याने बॅटिंग करावी लागली. पृथ्वी शॉ भोपळा न फोडता आऊट झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर 20 आणि अजिंक्य रहाणेने 22 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे मुंबईची 3 बाद 60 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या दोघांनी स्फोटक बॅटिंग करत वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. दोघांच्या दे दणादण बॅटिंगमुळे मुंबईला 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 192 धावांपर्यंत पोहचता आलं. सूर्याने 46 बॉलमध्ये 7 फोर आणि 4 सिक्ससह 70 रन्स केल्या. तर शिवमने 36 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 2 फोरसह नॉट आऊट 71 रन्स जोडल्या. तर सूर्यांश शेंडगे 1 धाव करुन माघारी परतला. सर्व्हिसेसकडून पूनम पुनिया, विशाल गौर, विकास यादव आणि अमित शुक्ला या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

मुंबईचा विजयी चौकार

सर्व्हिसेस प्लेइंग इलेव्हन : मोहित अहलावत (कॅप्टन आणि विकेटकीपर), कुंवर पाठक, नितीन तन्वर, मोहित राठी, गौरव कोचर, विनीत धनखर, अमित शुक्ला, विकास उमेश यादव, पूनम पुनिया, विशाल गौर आणि विकास हातवाला.

मुंबई प्लेइंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, शम्स मुलाणी, सूर्यांश शेडगे, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन आणि मोहित अवस्थी.

URL : smat mum vs ser mumbai won by 39 runs against services shardul thakur take 4 wickets and suryakumar yadav and shivam dube shine