टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि कर्णधारपद भूषवणारा अजिंक्य रहाणे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने स्फोटक खेळी करतोय. क्रिकेट चाहत्यांना रहाणेचं आयपीएल मेगा ऑक्शन 2025 नंतर दुसरं रुप पाहायला मिळालंय. पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिलेल्या रहाणेला कोलकाता नाईट रायडर्सने दुसऱ्या फेरीत आपल्या ताफ्यात घेतलं. रहाणेने तेव्हापासून धमाकाच लावला आहे. रहाणेने आज 11 डिसेंबरला सय्यद मु्श्ताक अली ट्रॉफीतील चौथ्या उपांत्य पूर्व फेरीतील सामन्यात विदर्भ विरुद्ध चाबूक बॅटिंग केली.
विदर्भाने विजयासाठी 222 धावांचं आव्हान दिलं होतं. रहाणेने विजयी धावांचा पाठलाग करताना 84 धावांची स्फोटक खेळी केली. पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी सुरुवात केली. या दोघांनी तोडफोड बॅटिंग करत मुंबईला अप्रतिम सुरुवात करुन दिली. दोघांनी 7 ओव्हरमध्ये 83 धावांची भागीदारी केली. त्यानंतर पृथ्वी 26 बॉलमध्ये 49 धावा करुन आऊट झाला.
रहाणे पृथ्वीनंतर श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव या दोघांसोबत छोटेखानी भागीदारी करताना मैदानात चौफेर फटकेबाजी केली. रहाणेने विदर्भाच्या गोलंदाजांची पिसं काढली. रहाणेच्या या फटकेबाजी दरम्यान कॅप्टन श्रेयस अय्यर 5 तर सूर्यकुमार 9 धावां करुन बाद झाले. त्यामुळे पुन्हा एकदा रहाणेच्या खांद्यावर जबाबदारी आली. रहाणेने समर्थपणे ही जबाबदारी सांभाळत धावा केल्या आणि रनरेट कायम ठेवला.
रहाणेने धावांचा पाऊस पाडत होता. रहाणेला रोखायचं तरी कसं, असा सवाल विदर्भ टीमला पडला. मात्र रहाणेने त्याची फटकेबाजी अशीच सुरु ठेवली. रहाणे शतकाजवळ पोहचला. मात्र त्याला शतक काही करता आलं नाही. रहाणेला रोखण्यात विदर्भाचा गोलंदाजाला ‘यश’ आलं. यश ठाकुरने रहाणेला मंदार महाले याच्या हाती कॅच आऊट केलं. रहाणने 186.67 च्या स्ट्राईक रेटने 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 84 धावा केल्या.
अजिंक्य रहाणेची विंध्वसक खेळी
Ajinkya Rahane yet again played a crucial & a splendid knock of 84(45) to help Mumbai chase down 222 against Vidarbha in #QF4
Watch 📽️ his superb knock 🔽https://t.co/TOyaUaRxjw#SMAT | @IDFCFIRSTBank
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 11, 2024
मुंबई प्लेइंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), तनुष कोटीयन, मोहित अवस्थी आणि अथर्व अंकोलेकर.
विदर्भ प्लेइंग इलेव्हन : जितेश शर्मा (कर्णधार आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, करुण नायर, पार्थ रेखाडे, मंदार महाले, शुभम दुबे, अपूर्व वानखडे, हर्ष दुबे, दर्शन नळकांडे, यश ठाकूर आणि दीपेश परवानी.