Cricket : हार्दिक पंड्या-सूर्यकुमार यादव शुक्रवारी आमनेसामने, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

| Updated on: Dec 12, 2024 | 9:43 PM

Baroda vs Mumbai Semi Final Live Streaming : शुक्रवारी 13 डिसेंबरला टीम इंडियाचे 2 मुख्य आणि आजी माजी खेळाडू आमनेसामने भिडणार आहेत. सूर्यकुमार यादव विरुद्ध हार्दिक पंड्या यांच्यातील लढतीकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

Cricket : हार्दिक पंड्या-सूर्यकुमार यादव शुक्रवारी आमनेसामने, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
Hardik Pandya And Suryakumar Yadav
Image Credit source: PTI and Icc
Follow us on

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 स्पर्धेसाठी उपांत्य फेरीसाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. मुंबई, मध्य प्रदेश, बडोदा आणि दिल्लीने सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलं आहे. आता या 4 संघांमध्ये ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. उपांत्य फेरीतील दोन्ही सामने हे एकाच दिवशी आणि एकाच मैदानात होणार आहेत.मुंबई विरुद्ध बडोदा यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली विरुद्ध मध्य प्रदेश आमनेसामने आहेत. मात्र मुंबई विरुद्ध बडोदा यांच्यातील सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. या दोन्ही संघात टीम इंडियाचे रथी-महारथी खेळाडू असल्याने क्रिकेट चाहते या सामन्यासाठी उत्सूक आहेत.

सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात बडोदा विरुद्ध मुंबई आमनेसामने असणार आहेत. हा सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याला सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे. श्रेयस अय्यर मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर कृणाल पंड्या याच्याकडे बडोद्याच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओ सिनेमा एपवरुन सामना पाहता येईल.

हार्दिक विरुद्ध मुंबई

या सामन्यात हार्दिक पंड्या विरुद्ध सूर्यकुमार पंड्या अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. मुंबईच्या संघात श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ असे टीम इंडियासाठी खेळणाऱ्या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. तर बडोदा टीममध्ये हार्दिक आणि कृणाल हे प्रमुखे खेळाडू आहेत. त्यामुळे पंड्या बंधू टीम इंडियातील सहकाऱ्यांविरुद्ध कसा खेळ करतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

मुंबई टीम : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), तनुष कोटियन, मोहित अवस्थी, अथर्व अंकोलेकर, शम्स मुलानी, सिद्धेश गोयल, रॉयल गोयल, जयेश लाडके. बिस्ता, साईराज पाटील, आकाश आनंद, अंगकृष्ण रघुवंशी, हिमांशू सिंग आणि एम जुनेद खान.

बडोदा टीम : कृणाल पंड्या (कर्णधार), शाश्वत रावत, अभिमन्यू सिंग राजपूत, भानू पानिया, शिवालिक शर्मा, हार्दिक पंड्या, विष्णू सोळंकी (विकेटकीपर), अतित शेठ, महेश पिठिया, लुकमान मेरिवाला, आकाश महाराज सिंग, राज लिंबानी, चिंतल गांधी, अश्वत कुमारद्वीप, एन भट्ट, मितेश पटेल, शुभम श्यामसुंदर शर्मा, सोयेब सोपारिया, ज्योत्सनील सिंग आणि लक्षित टोकसिया.