14 चौकार आणि 10 षटकारांसह शतकांची हॅटट्रिक, Tilak Varma चा वर्ल्ड रेकॉर्ड

| Updated on: Nov 23, 2024 | 4:42 PM

Tilak Varma World Record : टीम इंडियाचा फलंदाज तिलक वर्मा याने राक्षसी खेळी केली आहे. तिलक वर्मा याने टी 20 क्रिकेटमध्ये शतकांची हॅटट्रिक पूर्ण केली आहे. तिलक असा कारनामा करणारा पगिला फलंदाज ठरला आहे.

14 चौकार आणि 10 षटकारांसह शतकांची हॅटट्रिक, Tilak Varma चा वर्ल्ड रेकॉर्ड
tilak varma team india
Image Credit source: tilak varma x account
Follow us on

टीम इंडियाचा युवा आणि विस्फोटक फलंदाज तिलक वर्मा याने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातील धमाका भारतातही सुरु ठेवला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग 2 शतकं ठोकणाऱ्या तिलकने भारतात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत हैदराबादंच नेतृत्व करताना मेघालयविरुद्ध विस्फोटक दीडशतकी खेळी केली. तिलकने यासह शतकांची हॅटट्रिकही पूर्ण केली. तिलकच्या या खेळीसह हैदराबादने या स्पर्धेत विजयी सुरुवात केली.

मेघालयने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हैदराबादने जी राहुल सिंह यांच्या रुपात 1 धावेवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर कॅप्टन तिलक वर्मा मैदानात आला आणि सर्व सूत्रं हातात घेतली. तिलकने आपल्या सहकाऱ्यांसह मेघालयच्या गोलंदाजांची धुलाई केली. दुसऱ्या बाजूने मेघालयने हैदराबादला झटके दिले. मात्र त्यामुळे हैदराबादला विशेष असा फरक पडला नाही.

हैदराबादकडून तन्मय अग्रवाल याने 55 धावा केल्या. जी राहुल सिंह याला भोपळाही फोडता आला नाही. राहुल बुद्धी याने 30 धावांचं योगदान दिलं. तर तिलक वर्मा याच्या स्फोटक खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 248 धावांचा डोंगर उभा केला. तिलक वर्मा 67 बॉलमध्ये 151 धावांवर डावातील शेवटच्या चेंडूवर आऊट झाला. तिलकने या खेळीत 14 चौकार आणि 10 षटकार ठोकले. अर्थात तिलकने चौकार आणि षटकारांच्या मदतीने एकूण 26 चेंडूत 116 धावा ठोकल्या.

शतकांची हॅटट्रिक

तिलक वर्मा याने  खेळीदरम्यान टी 20 क्रिकेटमध्ये शतकांची हॅटट्रिक पूर्ण केली. तिलक टी 20 क्रिकेटमध्ये सलग 3 शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला. तिलकने याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या टी 20i सामन्यात शतक ठोकलं होतं.

मेघालयचा पराभव

दरम्यान मेघालयचं 249 धावांच्या पाठलाग करताना 15.1 ओव्हरमध्ये 69 रन्सवर पॅकअप झालं. मेघालयकडून फक्त दोघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. तिघांना भोपळाही फोडता आला नाही. तर इतरांनी हैदराबादच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले.

हैदराबाद प्लेइंग इलेव्हन : तिलक वर्मा (कर्णधार), अनिकेथ रेड्डी, तन्मय अग्रवाल, गहलौत राहुल सिंग, राहुल बुद्धी, प्रतीक रेड्डी (विकेटकीपर), तेलकुपल्ली रवी तेजा, तनय त्यागराजन, चामा व्ही मिलिंद, मिकिल जयस्वाल आणि सरनू निशांत.

मेघालय प्लेइंग इलेव्हन : आकाश चौधरी (कर्णधार), लॅरी संगमा, हेमंत फुकन, अनिश चरक, अर्पित भटेवरा (विकेटकीपर), डिप्पू संगमा, राम गुरुंग, जसकिरत सिंग, रोशन वारबाह, स्वराजीत दास आणि वानलांबोक नोंगखलाव.