स्मृती मानधना ही नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हीच्या अनुपस्थितीत आयर्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. स्मृतीला पहिल्या सामन्यात अर्धशतक करता आलं नाही. स्मृतीने त्याची भरपाई दुसऱ्या सामन्यात केली. स्मृतीने दुसऱ्या सामन्यात 73 धावांची खेळी केली. स्मृतीला शतक करण्याची संधी होती. स्मृतीने तिसर्या आणि आणि अंतिम सामन्यात शतकी खेळी करत बॅटिंगसह मालिकेचा शानदार शेवट केला. स्मृतीने या शतकी खेळीसह अनेक विक्रम आपल्या नावावर केले. स्मृतीने काय काय केलं? जाणून घेऊयात.
स्मृतीने आयर्लंडविरुद्ध 70 चेंडूत शतक पूर्ण केलं. स्मृतीच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 10 वं शतक ठरलं. स्मृतीने यासह 10 एकदिवसीय शतकं करणारी पहिली भारतीय आणि एकूण चौथी महिला क्रिकेटपटू ठरली. तसेच स्मृतीने 70 चेंडूत शतक करत नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हीचा वेगवान शतक करण्याचा विक्रम मोडीत काढला. स्मृतीने हरमनप्रीतच्या तुलनेत 17 चेंडूंआधी शतक पूर्ण केलं. स्मृती यासह टीम इंडियाकडून वेगवान शतक करणारी पहिली महिला क्रिकेटर ठरली.
मेग लँनिंग : 15
सूजी बेट्स : 13
टॅमी ब्यूमोन्ट : 10
स्मृती मानधना : 10
स्मृतीने प्रतिका रावल हीच्यासह 233 धावांची सलामी भागीदारी केली. स्मृतीने या दरम्यान 135 धावांची खेळी केली. स्मृतीने 168.75 च्या स्ट्राईक रेटने ही खेळी खेळी केली. स्मृतीने या खेळीत 12 चौकार आणि 7 षटकार लगावले. स्मृतीने चौकार आणि षटकारांच्या मदतीने 19 बॉलमध्ये 90 रन्स केल्या.
स्मृतीचं 10 वं एकदिवसीय शतक
Led from the front and how 👏👏
What a knock THAT 🙌
Updates ▶️ https://t.co/xOe6thhPiL#TeamIndia | #INDvIRE | @IDFCFIRSTBank | @mandhana_smriti pic.twitter.com/4dQVq6JTRm
— BCCI Women (@BCCIWomen) January 15, 2025
70 बॉल, स्मृती मानधना विरुद्ध आयर्लंड, राजकोट, 2025,
87 बॉल, हरमनप्रीत कौर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, बंगळुरु, 2024
90 बॉल, हरमनप्रीत कौर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, डर्बी 2017
90 बॉल, जेमिमाह रॉड्रिग्स विरुद्ध आयर्लंड, राजकोट, 2025,
वूमन्स इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मानधना (कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, सायली सातघरे, मिन्नू मणी, तनुजा कंवर आणि तितस साधू.
वूमन्स आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन : सारा फोर्ब्स, गॅबी लुईस (कर्णधार), कुल्टर रेली (विकेटकीपर), ओर्ला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलानी, लीह पॉल, अर्लीन केली, अवा कॅनिंग, जॉर्जिना डेम्पसी, फ्रेया सार्जेंट आणि अलाना डालझेल.