मुंबई : आयपीएलप्रमाणे इतर देशांमध्येही प्रीमियर लीगचा धुमधडका सुरु आहे. त्यामुळे खेळाडूंना वेगवेगळ्या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळत आहे. सध्या लंका प्रीमियर लीग सुरू आहे. या स्पर्धेत दोन वेळा मैदानात साप घुसल्याची घटना घडली आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणारा इसुरु उडाना सापाला पाहताच घाबरला. सध्या इसुरु उडाना लंका प्रीमियर लीगमध्ये लव्ह कँडी संघाकडून खेळत आहे. या स्पर्धेतील 15 वा सामना जाफना किंग्स आणि लव्ह कँडी यांच्यात सुरु होता. हा सामना सुरु असतानाच सापाने एन्ट्री मारली. जशी कॅमेरामनची नजर बाउंड्रीच्या पार सापावर पडली. तसा कॅमेरामन कॅमेरा सोडून पळून गेला. आता या स्पर्धेतील दुसरा व्हिडीओ समोर आला आहे. यात साप मैदानात फिरत असल्याचं दिसत आहे.
जाफना किंग्स विरुद्धच्या सामन्यात लव्ह कँडी संघाने 8 गडी गमवून 178 धावा केल्या आणि विजयासाठी 179 धावांचं आव्हान दिलं. विजयी आव्हान गाठण्यासाठी जाफना संघ मैदानात उतरला. तव्हे उडाना क्षेत्ररक्षणासाठी आपल्या जागेवर जात होता. पण मागे जात असताना त्याची नजर पायाजवळ आलेल्या सापावर पडली. त्याला पाहाताच उडाना दचकला पळाला.
It’s snaking around in Colombo today…#LPLT20 pic.twitter.com/JzrWLaQYcy
— Hemant (@hemantbuch) August 12, 2023
यानंतर साप बाउंड्री लाईनजवळ दिसला. सापाला पाहताच बाउंड्रीजवळ उभा असलेला कॅमेरामन पळून गेला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कँडी संघाने दिलेलं आव्हान जाफना संघाला काही गाठता आलं नाही. 6 गडी गमवून 170 धावा करता आल्या. कँडी संघाने 8 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात उडाना याने 4 षटकं टाकून 30 धावा दिल्या आणि एक गडी बाद केला.
Lucky escape for @IAmIsuru17 from the RPS snake #LPL2023 🐍🇱🇰🏏 pic.twitter.com/OnYokQxzvW
— Azzam Ameen (@AzzamAmeen) August 13, 2023
लंका प्रीमियर लीगमधील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी गॉल टायटन्स आणि दांबुला यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात सापाने एन्ट्री मारली होती.