Aiden Markram याचं वर्ल्ड कपमधील वेगवान शतक, 12 वर्षांनंतर वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, श्रीलंकेला फोडलं

| Updated on: Oct 07, 2023 | 6:53 PM

Icc World Cup Fastet Century By Aiden Markram | दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमच्या एडन मारक्रम याने इतिहास रचला आहे. एडनने तब्बल 12 वर्षानंतर वेगवान शतक करत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

Aiden Markram याचं वर्ल्ड कपमधील वेगवान शतक, 12 वर्षांनंतर वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, श्रीलंकेला फोडलं
Follow us on

नवी दिल्ली | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका टीमने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात झंझावाती सुरुवात केली आहे. श्रीलंका टीमने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दक्षिण आफ्रिकेने या निर्णयाचा जबरदस्त फायदा घेतला. क्विंटन डी कॉक, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन याच्यानंतर एडन मारक्रम याने शतक ठोकलं. एडनच्या शतकासह दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कपमधील एकाच मॅचमध्ये सर्वाधिक 3 शतकं ठोकणारी पहिली टीम ठरली. तसेच एडन मारक्रम याने वर्ल्ड कपमध्ये वेगवान शतक ठोकलं. एडन याने 12 वर्षांनंतर वर्ल्ड कपमधील वेगवान शतक करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

एडन मार्करम याने सिक्स ठोकत वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतक पूर्ण केलं. एडनने 49 बॉलमध्ये 14 चौकार आणि 3 गगनभेदी षटकारांसह शतक ठोकलं. एडनने यासह आयर्लंडच्या केविन ओब्रायन याचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. केविन ओब्रायन याने 2011 साली वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना 50 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं होतं. एडन मारक्रम याला शतकानंतर मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र एडन मारक्रम 6 धावांनंतर आऊट झाला. एडनने 54 बॉलमध्ये 14 चौकार आणि 3 सिक्ससह 196 च्या स्ट्राईक रेटने 106 धावा केल्या.

दरम्यान एडनव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका टीमकडून क्विंटन डी कॉक आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसेन या दोघांनीही वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. डी कॉक याने 84 बॉलमध्ये 12 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 100 धावा केल्या. तर रॅसी व्हॅन डेर ड्युसेन याने 110 बॉलमध्ये 13 चौकार आणि 2 सिक्ससह 108 धावांची शतकी खेळी केली.

एडनचा पराक्रम

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी एनगिडी आणि कगिसो रबाडा.

श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शनाका (कर्णधार), कुसल परेरा, पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीप), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेल्लालागे, मथीशा पाथिराना, दिलशान मदुशंका आणि कसून राजिथा.