T20I World Cup 2024 : टी 20 वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेची घोषणा, टेम्बा बावुमाचा पत्ता कट

| Updated on: Apr 30, 2024 | 3:50 PM

South Africa announce T20 World Cup 2024 squad : दक्षिण आफ्रिकेने टी 20 वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केला आहे.

T20I World Cup 2024 : टी 20 वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेची घोषणा, टेम्बा बावुमाचा पत्ता कट
south africa cricket team,
Image Credit source: south africa X Account
Follow us on

क्रिकेट विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेने आपला संघ जाहीर केला आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. एडन मारक्रम हा दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व सांभाळणार आहे. तर 2 युवा अनकॅप्ड खेळाडूंची थेट वर्ल्ड कपसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच लुंगी एन्गिडी आणि नांद्रे बर्गर या दोघांना राखीव म्हणून संधी दिली गेली आहे. तसेच वनडे आणि टेस्ट कॅप्टन टेम्बा बावुमा याला डच्चू दिली गेला आहे.

युवा खेळाडूंची निवड

दक्षिण आफ्रिकेने टी 20 वर्ल्ड कपसाठी 2 अनकॅप्ड खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामध्ये एक वेगवान गोलंदाज आहे. तर दुसरा विकेटकीपर बॅट्समन आहे. बॉलर ओटनील बार्टमॅन याने सनरायजर्स इस्टर्न केपसाठी 8 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत. तर रयान रिकेल्टन याने गेल्या साउथ अफ्रिका टी 20 लीग स्पर्धेच्या हंगामात एमआय केपटाऊनकडून खेळताना 173.77 च्या स्ट्राईक रेटने 530 धावा केल्या होत्या.

दक्षिण आफ्रिका कोणत्या गटात?

दरम्यान आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार हा 1 ते 29 दरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. त्या 20 संघांना 5-5 नुसार 4 ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. त्यानुसार दक्षिण आफ्रिका टीम डी ग्रुपमध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेसह या ग्रुपमध्ये श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स आणि नेपाळ या संघांचा समावेश आहे. प्रत्येक टीम साखळी फेरीत आपल्या ग्रुपमधील उर्वरित 4 संघांविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर प्रत्येक गटातून पहिले 2 संघ सुपर 8 साठी पात्र ठरतील.

दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

दक्षिण आफ्रिकेचा संघ: एडन मारक्रम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, ब्योर्न फॉर्च्युइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को जान्सेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, एनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तरबेज शम्सी आणि ट्रिस्टन स्टब्स.

राखीव खेळाडू : नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी