मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील पहिल्या कसोटी सामन्यात आफ्रिका संघाने एक डाव आणि 32 धावांनी विजय मिळवला आहे. आफ्रिकेने घेतलेल्या 163 धावांच्या आघाडीनंतर दुसऱ्या डावात बॅटींगला उतरलेली टीम इंडिया 131 वर ऑल आऊट झाली. तिसऱ्या दिवशीच टीम इंडियाचा आफ्रिकेने सुफडा साफ केला. कगिसो रबाडा आणि नांद्रे बर्गर यांच्यासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी सपसेश नांगी टाकली. या विजयासह दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिका संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या पराभवासह टीम इंडियाचं आफ्रिकेमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्न अधुर राहिलं आहे.
तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाल्यावर डीन एल्गर आणि मार्को जॅन्सन यांनी टीम इंडियाच्या बॉलर्सला चांगलंच तंगवलं. डीन एल्गर द्विशतक ठोकणार असं वाटत होतं. शार्दुल ठाकूर याने टीम इंडियाला यश मिळवून देत एल्गरला 185 धावांवर आऊट केलं. त्यानंतर मार्को जॅन्सन याने आपल्या हातात डावाची सूत्रे घेतली होती. अश्विन आणि बुमराहने तीन विकेट घेत आफ्रिका संघाला 408 धावांवर गुंडाळलं.
साऊथ आफ्रिकने 163 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात टीम इंडिया उतरली तेव्हा रबाडाने सुरूवातील मोठा धक्का दिला. रोहित शर्मा याला शून्यावर माघारी पाठवत झकास सुरूवात केली होती. टीम इंडियाच्या फलंदाजांना या धक्क्यानंतर मोठी भागीदारी करता आली नाही. विराट कोहली सोडला तर सर्वांनीच हजेरी लावून जाण्याचं काम केलं.
रोहित शर्मा (0 धावा), यशस्वी जयस्वाल (26 धावा), शुबमन गिल (5 धावा), श्रेयस अय्यर (6 धावा), केएल राहुल (6 धावा), रविचंद्रन अश्विन(0 धावा), शार्दुल ठाकूर(2 धावा), जसप्रीत बुमराह(0 धावा), मोहम्मद सिराज(4 धावा) आणि प्रसिद्ध कृष्णा नाबाद 0 आणि विराट कोहली (76 धावा)
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर, एडन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा