टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामना हा 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला मोठा झटका लागला आहे. आयसीसी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. बुमराहला या क्रमवारीत प्रचंड नुकसान झालं आहे. बुमराहला बॉलिंग रँकिंगमधील पहिलं स्थान गमवावं लागलं आहे. बुमराहला नंबर 1 गोलंदाजाचा बहुमान गमवावा लागला आहे. बुमराहला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यात विशेष असं काही करता आलं नाही. बुमराहला त्याचाच फटका बसला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाजाने बुमराहला मागे टाकलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाने आतापर्यंत बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत धमाकेदार कामगिरी केली आहे.
जसप्रीत बुमराहला पुण्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटीत एकही विकेट मिळाली नव्हती. त्यामुळे बुमराहला पहिलं स्थान गमवावं लागलं आहे. बुमराहला 2 स्थानांचा फटका बसला आहे. बुमराहची थेट तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तर कगिसो रबाडा नंबर 1 गोलंदाज ठरला आहे. कगिसो रबाडा याने अवघ्या काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला होता.
दक्षिण आफ्रिका सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सामन्यात बांगलादेशवर मात करत आशियात तब्बल 10 वर्षांनी विजय मिळवला. कगिसो रबाडा हा दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. रबाडाने त्या सामन्यातील पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 6 असे एकूण 9 विकेट्स घेतल्या.
टीम इंडियाला फटका
New World No.1 🥇
South Africa’s star pacer dethrones Jasprit Bumrah to claim the top spot in the ICC Men’s Test Bowling Rankings 👇https://t.co/oljRIUhc5T
— ICC (@ICC) October 30, 2024
दरम्यान टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याला या रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. यशस्वी फलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. तर ऋषभ पंत याला फटका बसला आहे. पंतला 5 स्थानांच नुकसान झाल्याने तो सहाव्यावरुन थेट अकराव्या स्थानी फेकला गेला आहे. विराट कोहलीला 6 स्थानांनी फटका बसल्याने तो 14 व्या स्थानी घसरला आहे. कॅप्टन रोहित शर्मा 9 स्थांनाचं नुकसान झालं आहे. रोहितची 24 व्या क्रमाकांवर घसरण झाली आहे. तर शुबम गिल 19 व्या स्थानावरुन 20 व्या क्रमांकावर पोहचला आहे.