IND vs SA : आफ्रिकेच्या मानहानिकारक पराभवाबाबत बोलताना बावुमाने रोहितला मानलं दोषी, म्हणाला…

| Updated on: Nov 06, 2023 | 5:35 PM

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाबाबत बोलताना कर्णधार टेम्बा बावुमा याने रोहित याला कारणीभूत ठरवलं. विराटने शतक करण्याआधी त्याने केलेल्या तोडफोड फलंदाजीने आफ्रिकेच्या बॉलर्सचं खच्चीकरण झालं असावं.

IND vs SA : आफ्रिकेच्या मानहानिकारक पराभवाबाबत बोलताना बावुमाने रोहितला मानलं दोषी, म्हणाला...
Follow us on

 मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये बाहुबली असलेले दोन संघ  भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ एकमेकांना भिडले. या सामन्यामध्ये स्टार खेळाडू विराट कोहली याने शतकी खेळी करत सचिन तेंडुलकरच्या शतकाच्या  बरोबरी साधली. भारताच्या 326 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेच संघ 83 धावांवर ऑल आऊट झाला. सामना झाल्यानंतर आफ्रिका संघाता  टेम्बा बावुमा याने आपलं मत मांडताना भारताच्या कॅप्टनच्या खेळीबाबत वक्तव्य केलं.

काय म्हणाला टेम्बा बावुमा?

आम्हाला माहित होतं की आव्हान मोठं होतं, चेस करताना आम्ही सामना गमावला. पहिल्या 10 ओव्हरमध्ये 90 धावा निघाल्या होत्या. त्यानंतर आम्ही कमबॅक करत स्कोरला ब्रेक लावला होता. मात्र रोहितने एक टेम्पो सुरूवातीला सेट करून दिला त्यानंतर अय्यर आणि कोहली यांनी चांगली भागीदारी केली. आम्हाला विकेटसोबत जुळवून घेता आलं नाही पण परत एकदा भारत-आफ्रिका सेमीफायनलमध्ये खेळू शकतो, अशी प्रतिक्रिया कर्णधारा टेम्बा बावुमा याने दिली.

रोहित शर्मा याने सामन्याच्या सुरूवातीपासूनच आक्रमण सुरू केलं होतं. दक्षिण आफ्रिकेच्या एकही गोलंदाजाला त्याने सोडलं नाही. रोहितने जो टेम्पो सेट केला त्यामुळे नंतरच्या ओव्हरमध्ये आफ्रिकेच्या स्पिनर्सने केलेल्या दबावाचा काही फायदा झाला नाही. आफ्रिकेने या वर्ल्डकपमध्ये 400 धावांचा टप्पा पार करून सर्वांनाच धक्का दिला होता. मात्र भारतासमोर त्यांची बॅटींग फेल गेलेली दिसून आली.

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (WK), टेम्बा बावुमा (C), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज